शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

दहशतवाद्यांनी केली अनेक शहरांत रेकी; ते दोघेही ‘अल सफा’शी मागील चार वर्षांपासून संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 10:25 IST

त्यांच्या लॅपटाॅप, मोबाइलमध्ये तब्बल ५०० जीबी डेटा आढळल्याचे राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

पुणे : पुणे शहर पोलिसांनी पकडलेल्या २ दहशतवाद्यांनी राज्यातील अनेक शहरांत रेकी केली होती. ते हॉटेलमध्ये मुक्काम करण्याऐवजी तंबूत राहत असत. त्यांच्या लॅपटाॅप, मोबाइलमध्ये तब्बल ५०० जीबी डेटा आढळल्याचे राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात एटीएसने आतापर्यंत दोन दहशतवादी व त्यांना सहकार्य करणारे दोघे अशा चौघांना अटक केली आहे. मोहम्मद इम्रान युनूस खान आणि युनूस याकूब साकी (दोघे मूळ रा. रतलाम, मध्य प्रदेश) या एनआयएच्या दोन फरार दहशवाद्यांचा यात समावेश आहे. त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे. त्याच्या शोधासाठी अनेक पथके कार्यरत आहेत.हे दोघे दीड वर्षांपासून पुण्यात वास्तव करून होते. आपण ग्राफिक डिझायनर असल्याचे सांगत असले तरी त्यांचे शिक्षण १२ वीपर्यंतही झाले नसल्याचे एटीएस अधिकारी म्हणाले. या दोघांकडे ड्रोन सापडले असून त्याच्या सहाय्याने त्यांनी अनेक ठिकाणचे चित्रिकरण केले आहे. ते नेमके कोणत्या ठिकाणचे आहे, त्याचा फॉरेन्सिंग तज्ज्ञ शोध घेत आहेत.

‘अल सफा’च्या संपर्कातदोघेही पूर्णपणे ब्रेनवॉश केलेले कट्टर दहशतवादी असून त्यांच्याकडे आढळलेली कागदपत्रे व अन्य साहित्यावरून ते अल सफा या दहशतवादी संघटनेशी ३ ते ४ वर्षांपासून संपर्कात असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या लॅपटॉपमध्ये जिहादी असे व्हिडीओ, पुस्तके, वैयक्तिक यूट्युबवरील भाषणे, पीडीएफ कागदपत्रे आढळली.

लॅपटॉपमध्ये ५०० जीबी डेटालॅपटॉपची क्षमता ही साधारण ५०० जीबी इतकी असते. त्यांच्याकडील २ लॅपटॉप व मोबाइलमध्ये ५०० चित्रपटांइतका डेटा अशा प्रकारच्या वादग्रस्त व्हिडीओ, पुस्तके व इतर साहित्यांनी भरलेला आहे.

तंबूत मुक्कामहे दोघे राज्यातील व पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी फिरले आहेत. त्या काळात त्यांनी एकदाच हॉटेलमध्ये राहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते नाव बदलून राहिले होते. अन्य वेळी कोठेही गेले तरी ते तंबू बरोबर घेऊन जात व त्यात मुक्काम करीत. त्यामुळे ते कधीही रडारवर आले नसल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांना मदत करणारे अनेक जण असून त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्याविषयी ठोस पुरावा एसटीएस गोळा करीत आहेत.

पुण्यातील ज्यूंचे प्रार्थनास्थळ पडले बंदपुणे : इस्रायली, तसेच अमेरिकन ज्यूंचे पुण्यातील प्रार्थनास्थळ अर्थात खब्बात हाउस येथील धर्मगुरू इस्रायलला स्थलांतरित झाल्याने आता बंद करण्यात आले आहे. ते गेली कित्येक वर्षे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होते. कोरेगाव पार्कमधील ओशो आश्रमात येणाऱ्या ज्यू धर्मीयांसाठी सन १९९२ मध्ये हे प्रार्थनास्थळ सुरू केले होते. धर्मगुरूंनीच स्थलांतर केल्याने आता हे प्रार्थनास्थळ उघडेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीPoliceपोलिस