विमानतळाभोवतीच्या झोपड्यांचे पुनर्वसन

By Admin | Updated: March 31, 2015 04:14 IST2015-03-31T04:14:00+5:302015-03-31T04:14:00+5:30

सांताक्रूझ विमानतळाच्या जागेवरील झोपड्या हटविण्याच्या दृष्टीने कारवाई सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. विमानतळ प्राधिकरणाने त्यांना वाटणा-या महत्वाच्या जागा कळवल्यानंतर जवळपास १७ हजार झोपड्या

Rehabilitation of huts around the airport | विमानतळाभोवतीच्या झोपड्यांचे पुनर्वसन

विमानतळाभोवतीच्या झोपड्यांचे पुनर्वसन

मुंबई : सांताक्रूझ विमानतळाच्या जागेवरील झोपड्या हटविण्याच्या दृष्टीने कारवाई सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. विमानतळ प्राधिकरणाने त्यांना वाटणा-या महत्वाच्या जागा कळवल्यानंतर जवळपास १७ हजार झोपड्या हटविण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिली.
या झोपडीधारकांना कुर्ला येथील सदनिकांमध्ये हलवले जाईल. विमानतळ प्राधिकरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत शासनाची भूमिका सकारात्मक असून पुनर्वसनाची कार्यवाही लवकर करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीत सांगितले. सध्या एअरपोर्टच्या आॅपरेशनसाठी ज्या जागा लागतील त्यांची यादी तात्काळ देण्याचे आदेश प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. त्यानंतर दोन महिन्यात झोपडीधाकरांची पात्रता तपासून त्यांना नव्या घरांमध्ये पाठवले जाईल. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, पुनम महाजन, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, एमएमआरडीएचे व्यवस्थापकीय संचालक मदाने आदी उपस्थित होते.

 

Web Title: Rehabilitation of huts around the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.