पीडित मुरळीचे पुनर्वसन करणार

By Admin | Updated: December 31, 2014 01:07 IST2014-12-31T01:07:59+5:302014-12-31T01:07:59+5:30

अल्पवयीन मुलीचे देवाशी लग्न लावून तिच्यावर सक्तीचे मातृत्व लादले गेल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली आहे.

Rehabilitating the affected fungus | पीडित मुरळीचे पुनर्वसन करणार

पीडित मुरळीचे पुनर्वसन करणार

अकोले (अहमदनगर) : अल्पवयीन मुलीचे देवाशी लग्न लावून तिच्यावर सक्तीचे मातृत्व लादले गेल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिव प्रिया खान यांनी या प्रकरणाची आस्थेने चौकशी केली व मदतीचे आश्वासन दिले आहे.
वर्तमानपत्रातील बातम्या वाचून पुण्यातील काहींनी पीडित मुलगी व तिच्या बाळास आर्थिक मदत देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बालकल्याण खात्यामार्फत पीडित मुलीच्या पुनर्वसनासाठी लवकरच प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
मुलीच्या आजीने नवसाची फेड म्हणून तिचे लहानपणीच खंडोबा देवाशी लग्न लावून तिला मुरळी बनवले होते. विविध ठिकाणी जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी गेल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले. त्यातून ती गरोदर राहिली व तिने एका मुलीला जन्म दिला. काही स्वयंसेवी संघटनांनी यात लक्ष घातल्यानंतर पोलिसांनी तिच्या आजीसह तिघांना अटक केली आहे. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे व्रत घेतलेल्या हेरंब कुलकर्णी यांनी या मुलीने शिक्षण घ्यावे, यासाठी सलग ९ वर्षे पाठपुरावा केला. मात्र तिला दुर्दैवी फेऱ्यातून वाचवू शकलो नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

मला ज्यांनी त्रास दिला त्यांना कठोर शिक्षा घडायला पाहिजे. मी एकटी राहून माझ्या मुलीला मोठं करणार आहे. - शोषित मुलगी

Web Title: Rehabilitating the affected fungus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.