निबंधक अधिकार्‍याला लाच घेताना अटक

By Admin | Updated: May 31, 2014 22:08 IST2014-05-31T21:43:03+5:302014-05-31T22:08:38+5:30

२०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी सहाय्यक सहकारी निबंधक अधिकारी महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

The registrar's officer was arrested for accepting a bribe | निबंधक अधिकार्‍याला लाच घेताना अटक

निबंधक अधिकार्‍याला लाच घेताना अटक

पुणे : सोसायटीच्या नोंदणीसाठी वकिलाकडे ९ हजार २०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी सहाय्यक सहकारी निबंधक अधिकारी महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. साखर संकुलातील उपनिबंधक कार्यालयामध्ये शनिवारी दुपारी करण्यात आली.
नूतन श्रीकांत भोसले (वय ४५) असे अटक करण्यात आलेल्या सहाय्यक सहकारी निबंधक अधिकारी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी एका वकिलाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, भोसले या साखर संकुलामधील उपनिबंधक कार्यालयामध्ये कार्यरत आहेत. तर तक्रारदार वकील हे सहकारी संस्था निबंधक कार्यालयामध्ये गृहनिर्माण संस्था नोंदणीचे आणि अभिहस्तांतरणाची कामे करतात. त्यांच्याकडे औंध येथील एका सोसायटीने त्यांच्या संस्था नोंदणीचे काम दिलेले होते. या कामासाठी भोसले यांनी सोसायटीमधील २३ सभासदांचे प्रत्येकी ४०० प्रमाणे ९ हजार २०० रुपयांची लाच २ मे रोजी मागितली होती. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली.

Web Title: The registrar's officer was arrested for accepting a bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.