‘पर्यटनमंत्र्यांवर गुन्हा नोंदवा’

By Admin | Updated: October 16, 2015 03:48 IST2015-10-16T03:48:59+5:302015-10-16T03:48:59+5:30

सेरुला कोमुनिदादची जमीन बेकायदा ताब्यात घेतल्याप्रकरणी म्हापशातील प्रथमवर्ग न्यायालयाने पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्यासह त्यांचे बंधू व कोमुनिदादच्या इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश

Register crime against tourism minister | ‘पर्यटनमंत्र्यांवर गुन्हा नोंदवा’

‘पर्यटनमंत्र्यांवर गुन्हा नोंदवा’

म्हापसा : सेरुला कोमुनिदादची जमीन बेकायदा ताब्यात घेतल्याप्रकरणी म्हापशातील प्रथमवर्ग न्यायालयाने पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्यासह त्यांचे बंधू व कोमुनिदादच्या इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश पर्वरी पोलिसांना गुरुवारी दिले.
तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलिसांना आदेश द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी न्यायालयात अर्जाद्वारे केली होती. या प्रकरणात दिलीप परुळेकर यांच्याविरुद्ध डिमेलो यांनी पर्वरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र त्याची नोंद करण्यात आली नव्हती. परिणामी ट्रोजन यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
परुळेकर यांनी कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने घोटाळा करून जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप डिमेलो यांनी केला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, दिलीप परुळेकर यांच्यासह त्यांचे बंधू प्रमोद दाभोळकर, कोमुनिदादचे अ‍ॅटर्नी पीटर मार्टिन्स, इर्मिन सिक्वेरा , कोमुनिदादच्या पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.
तिथे परुळेकर यांचे सुमारे २० चौरस मीटर जागेत छोट्याशा गाडीवर दुकान होते. आता विकत घेतलेली जमीन सुमारे ५९९ चौरस मीटर असून त्या जागेत मोठे दुकान थाटले आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: Register crime against tourism minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.