शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना संरक्षण देणा-या कलमाचा फेरविचार करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 04:48 IST

सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना संरक्षण देणा-या कलम ३५३ मध्ये सुधारणा सुचवण्यासाठी विधिमंडळाची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

नागपूर : सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना संरक्षण देणा-या कलम ३५३ मध्ये सुधारणा सुचवण्यासाठी विधिमंडळाची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी एक सर्वपक्षीय समिती नेमावी व त्या समितीने तीन महिन्यांच्या आत या प्रकरणी आपला अहवाल द्यावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली.पोलीस अधिकाºयांकडून आमदारांना मिळालेल्या अवमानकारक वागणुकीवरून बुधवारी विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला होता. सरकारी अधिकारी, कर्मचारी या कलमाचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप अनेक आमदारांनी विधानसभेत केला होता.शेवटी मुख्यमंत्री निवेदन करतील असे सांगून ती चर्चा थांबवण्यात आली होती. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, लोकप्रतिनिधींचा कुणीही अवमान करू नये. प्रशासनाने त्यांचा आदर राखला पाहिजे. ज्या तक्रारी बुधवारी लोकप्रतिनिधींनी केल्या त्या सगळ्यांची पोलीस महासंचालकांमार्फत १५ दिवसात चौकशी केली जाईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या चौकशीच्यावेळी आमदारांनाही बोलावले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीचा अर्ज भरायला गेलो तर अधिकारी बसून अर्ज घेतात कारण निवडणूक आयोगाने तसे आदेश काढले. मात्र इतर वेळीही अधिकारी तसेच वागतात, हे चुकीचे आहे. लोकप्रतिनिधींच्या हक्कासाठी हक्कभंग समिती आहेच पण त्याशिवाय छोट्या छोट्या तक्रारीसाठी एक सर्वपक्षीय आमदारांची औचित्याची समिती नेमली जाईल. ही समिती आलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेईल, दोन्ही बाजूच्या लोकांना बोलावून चौकशी करेल व निर्णय देईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.>सरकारी कामात अडथळा आणणाºयाच्या विरोधात कलम ३५३ अंतर्गत पाच वर्षांचा कारावास होतो, तसेच या कलमांतर्गत दाखल होणारा गुन्हा अजामीनपात्र आहे.अधिकारी या कलमाचा वापर करून खोट्या तक्रारी करतात आणि आमदारांनाही तुरुंगात टाकत असल्याची तक्रार अनेक आमदारांनी विधानसभेत केली होती.आमदारांच्या या भावना लक्षात घेऊन कलम ३५३ मध्ये सुधारणा सुचवण्यासाठी विधिमंडळाची समिती स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८