शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुणेरी डॉक्टरची शक्कल : तापमान कमी करण्यासाठी गाडीला शेणाचा लेप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 17:08 IST

वाढत्या तापमानाचा परिणाम टाळण्यासाठी पुण्यातील एका डॉक्टरने चारचाकी गाडीला शेणाचा लेप देऊन थंडावा मिळवल्याचा दावा केला आहे. आश्चर्य म्हणजे हा लेप सुमारे महिनाभर टिकत असून त्याने गाडीचे किंवा गाडीच्या रंगाचे कोणतेही नुकसान होत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

पुणे : वाढत्या तापमानाचा परिणाम टाळण्यासाठी पुण्यातील एका डॉक्टरने चारचाकी गाडीला शेणाचा लेप देऊन थंडावा मिळवल्याचा दावा केला आहे. आश्चर्य म्हणजे हा लेप सुमारे महिनाभर टिकत असून त्याने गाडीचे किंवा गाडीच्या रंगाचे कोणतेही नुकसान होत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.    याबाबत माहिती अशी की, डॉ नवनाथ दुधाळ यांनी महिंद्रा एक्सयूव्ही ५०० ही गाडी शेणाने लिंपली आहे. दुधाळ हे प्रसिद्ध टाटा कॅन्सर रुग्णालयात डॉक्टर आहेत. राज्यात सध्या वाढत्या उन्हाचा तडाखा कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. त्यामुळे होणारी अंगाची काहिली वाचवण्यासाठी वाळ्याचे पडदे, टोप्या, सनकोट असे पारंपरिक उपाय केले जातात. हल्ली थेट वरच्या मजल्यावरील उष्णता टाळण्यासाठी गच्चीला पांढऱ्या रंगाचा थरही दिला जातो. पण याही पुढे जात दुधाळ यांनी गाडीला शेणाच्या तीन थरांनी लिंपले आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील एका महिलेनेही आपल्या गाडीला शेणाने सारवले होते. काचा, खिडक्या, लाईट वगळता बाकीच्या पत्र्याच्या भागाला शेण लावण्यात आले आहे. यातील एक थर वाळल्यावर त्यावर दुसरा थर लावण्यात येतो.    याविषयी दुधाळ म्हणतात की, 'हा उपाय स्वस्त असून गाडीचा रंग किंवा पृष्ठभागावर कोणतेही परिणाम करत नाही. यामुळे आतील वातावरण सुमारे ७ ते ८ अंशांनी कमी होते. हल्ली तर मी एसी न वापरताही गाडीत बसू शकतो. पर्यावरणपूरक असलेल्या उपायात एकच अडचण म्हणजे शेण लावल्यावर काही तास त्याचा वास येतो मात्र गाडी पूर्ण वाळल्यावर हा वासही जातो.' अजून तरी कोणत्याही तज्ज्ञाने या उपायावर भाष्य केले नसले तरी शेणाने सारवलेली जमीन अनेकदा थंड राहत असल्याचे दिसून आले आहे. त्यातच भारतात शेण सहज उपलब्ध होत असल्याने पुढील उन्हाळ्यात अशा गाड्या अधिक संख्येने दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. 

टॅग्स :cowगायdoctorडॉक्टरcarकारcancerकर्करोगtechnologyतंत्रज्ञानTemperatureतापमान