शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खाद्य पदार्थांतून साखर, मीठ, चरबीयुक्त घटक कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 04:05 IST

देशभरातील उद्योगांनी मागितली तीन वर्षांची मुदत

- राजेश मडावीचंद्रपूर : खाद्य पदार्थांमध्ये साखर, मीठ आणि तळलेल्या पदार्थांमध्ये चरबीयुक्त घटकांचा अधिक समावेश असल्याने नागरिकांना जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ३० टक्के मृत्यू केवळ चुकीच्या आहारामुळे होत असल्याचे निष्कर्ष काढल्याने केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘इट राइट मुव्हमेंट’ सुरू केली आहे. या मोहिमेच्या बडग्यामुळे खाद्य पदार्थांतून साखर, मीठ व चरबीयुक्त घटक कमी करून आहाराचा ‘नवीन फार्म्युला’ तीन वर्षांच्या आत तयार करू, अशी मुदत २० पेक्षा अधिक मोठ्या उद्योग समूहांनी केेंद्र सरकारकडे मागितली आहे.खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे मधुमेह, हृदयरोग व उच्च रक्तदाब यासारखे आजार होतात. सॉस, सिरफ, रेडी टू इट- फू ड, मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांमुळे बालकांना विविध आजारांनी घेरले. त्यामुळे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने जागृती सुरूकेली आहे.अशी आहे ‘राइट इट मूव्हमेंट’मोहिमेचा उद्देश केवळ ‘कमी आणि पौष्टिक खा’ एवढ्यापुरताच नाही. दैनंदिन आहारात साखर, मीठ, मैदा व चरबीयुक्त पदार्थांचा अतिवापर केल्याने होणारे दुष्परिणाम समजून सांगावे. त्याविरोधात देशभरातील अन्न उत्पादक कंपन्यांनी ठोस पाऊल उचलावे. सध्याच्या पदार्थांमधून साखर, मीठ व मैदा वगळावे, यासाठी कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य अन्न व औषध प्रशासनातील सूत्रांनी दिली.साखरेत कोणतेही व्हिटॅमीन नसते. मैदा म्हणजे एक प्रकारचे पांढरे विष आहे. यात तंतूमय (फ ायबर ) पदार्थ नसतो. तेलाचा अधिक वापर शरीरावर अनिष्ट परिणाम करतो. निरोगी आहारासाठी आज विविध पर्याय उपलब्ध आहेत.- डॉ. गोपाल मुंदडा, आहारतज्ज्ञ, चंद्रपूरखाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेच अनेक आजार वाढत आहेत. त्यामुळे आहारातील हानिकारक अन्नघटक बाजूला काढून नवीन फॉर्म्युला तयार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही. त्यामुळे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘राईट इट मुव्हमेंट’ सुरू केली. त्याद्वारे देशभरात जागृती केली जात आहे.- पवन अगरवाल, कार्यकारी संचालक, अन्न सुरक्षा व गुणवत्ता प्राधिकरण, दिल्ली.