सत्तेचा लाल दिवा घाटाखालीच!
By Admin | Updated: March 21, 2017 14:03 IST2017-03-21T14:03:50+5:302017-03-21T14:03:50+5:30
बुलडाणा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या बुलडाणा जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे घाटाखालील जिल्हा परिषद सदस्यांचीच निवड झाली.

सत्तेचा लाल दिवा घाटाखालीच!
अध्यक्षपदी उमाताई तायडे, उपाध्यक्षपदी मंगलाताई रायपुरे यांची निवड
खामगाव : बुलडाणा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या बुलडाणा जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे घाटाखालील जिल्हा परिषद सदस्यांचीच निवड झाली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या मंगलाताई रायपुरे यांच्या रुपाने उपाध्यक्षपदही घाटाखालील मलकापूर तालुक्याला मिळाले आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना भाजपने शिवसेनेला बाजूला सारून राष्ट्रवादीशी घरोबा केला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्हा परिषदेवर भाजप-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.