अमरावती पोलीस काढणार आरोपीची रेड कॉर्नर नोटीस

By Admin | Updated: June 19, 2014 00:54 IST2014-06-19T00:54:05+5:302014-06-19T00:54:05+5:30

पैसे दुप्पट करुन देण्याचे प्रलोभन देऊन अमरावतीकरांना कोट्यवधी रुपयांनी गंडविणाऱ्या श्रीसूर्या समूहाचा एजंट प्रकाश ज्ञामदेव राऊत (५५,रा. दीपनगर, अमरावती) हा सिंगापूरला पसार झाला.

The Red Corner Notice of the accused to be removed from the Amravati police | अमरावती पोलीस काढणार आरोपीची रेड कॉर्नर नोटीस

अमरावती पोलीस काढणार आरोपीची रेड कॉर्नर नोटीस

पोलीस सिंगापूरला जाणार : श्रीसूर्या फसवणूक प्रकरण
अमरावती : पैसे दुप्पट करुन देण्याचे प्रलोभन देऊन अमरावतीकरांना कोट्यवधी रुपयांनी गंडविणाऱ्या श्रीसूर्या समूहाचा एजंट प्रकाश ज्ञामदेव राऊत (५५,रा. दीपनगर, अमरावती) हा सिंगापूरला पसार झाला. या आरोपीला पकडण्यासाठी अमरावती पोलीस केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना (इंटरपोल) ला पत्रव्यवहार करुन रेड कॉर्नर नोटीस (आंतरराष्ट्रीय स्तरावर फरार असणाऱ्या आरोपींची शोधपत्रिका) काढणार आहे. त्यानंतर आरोपी राऊतला पकडण्यासाठी पोलीस सिंगापूर येथे जाणार आहेत.
श्रीसूर्या समूहाचे मुख्य सूत्रधार समीर जोशी व पल्लवी जोशी यांनी एजंटांचे जाळे सर्वत्र पसरवून पैसे दुप्पट करुन देण्याचे प्रलोभन दिले आणि नागरिकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविले. याप्रकरणी जोशी दाम्पत्यांसह श्रीसूर्याच्या एजंटांविरुद्ध नागपूर, अमरावती, पुणे व अकोला पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी अमरावती पोलिसांनी समीर जोशी, पल्लवी जोशी, मोहन पितळे, मुकुंद पितळे, नितीन केसकर, अंजली काशीकर, शंतनू कुऱ्हेकर यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केलीे.
आरोपी अंजली काशीकर यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. उर्वरित आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपी प्रकाश राऊत व आनंद जहांगीरदार हे घटनेच्या दिवसापासून पसार आहेत.
आरोपी प्रकाश हा सिंगापूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याला पकडण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरु केल्या आहेत.
सिंगापूर येथील त्याचे ‘लोकेशन’ मिळवून त्याला अटक करण्यासाठी पोलीस सीबीआयमार्फत इंटरपोलला पत्रव्यवहार व रेड कॉर्नर नोटीस बजावणार आहे.
इंटरपोल सीबीआयमार्फत आरोेपीचे लोकेशन अमरावती पोलिसांना देणार आहेत. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार करुन विशेष न्यायालयातून आरोपी राऊत याचा स्टँडींग वॉरंट पोलीस काढणार आहे.
हा वॉरंट काढल्यावर तात्पुरत्या स्वरुपात पोलीस सिंगापूरचा व्हिसा पासपोर्ट तयार करुन आरोपीला पकडण्यासाठी सिंगापूर येथे जाणार आहे. आरोपीला अटक केल्यानंतर तेथील न्यायालयात हजर करुन पोलीस त्याला अमरावतीत आणणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

Web Title: The Red Corner Notice of the accused to be removed from the Amravati police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.