सोळा टक्के राखूनच होणार भरती
By Admin | Updated: February 20, 2015 01:12 IST2015-02-20T01:12:48+5:302015-02-20T01:12:48+5:30
अंतिम निर्णय होईपर्यंत १६ टक्के जागा बाजूला ठेवूनच भरती केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जुन्नर येथे दिली.

सोळा टक्के राखूनच होणार भरती
जुन्नर : मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळालेले १६ टक्के आरक्षण जरी न्यायालयीन प्रक्रियेत अडकले असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय होईपर्यंत १६ टक्के जागा बाजूला ठेवूनच भरती केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जुन्नर येथे दिली.
शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवजन्मस्थळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून बालशिवाजींना अभिवादन करण्यात आले. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार लक्ष्मण जगताप, शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे, अतुल बेनके आदी या वेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेली किल्ले शिवनेरीची पावनभूमी ही ऊर्जा देणारी भूमी आहे़ छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारा राज्य कारभार करू व किल्ले शिवनेरी विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही़ अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकासाठी केंद्र सरकारच्या लागणाऱ्या सगळ्या परवानग्या घेण्यात आल्या असून, लवकरच स्मारकाचे काम सुरू होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
च्परंपरेप्रमाणे किल्ले शिवनेरीवर आई शिवाई मंदिरात जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते सकाळी ६़३० वाजता अभिषेक करण्यात
आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवाई मंदिरात पूजा बांधली जाणार असल्याने प्रशासन सज्ज होते.
च्या वेळी खामगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी विनायक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन लाठीकाठी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले़ त्यास मुख्यमंत्र्यांसह उपस्थितांनी दाद दिली.
शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवजन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पारंपरिक पद्धतीने बाल शिवाजी व जिजाऊ साहेबांना अभिवादन केले. या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.