नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जयकुमार रावल यांची नियुक्ती
By Admin | Updated: November 10, 2016 17:33 IST2016-11-10T17:33:43+5:302016-11-10T17:33:43+5:30
जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शिंदखेड्याचे आमदार तथा पर्यटन व रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जयकुमार रावल यांची नियुक्ती
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 10 - जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शिंदखेड्याचे आमदार तथा पर्यटन व रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नंदुरबारसह नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा पदभार होता. मंत्रीपदाचा व्याप, नाशिकचा पदभार यामुळे महाजन यांचे जिल्ह्यात येणे कमी होते. त्यामुळे पालकमंत्री बदलण्याची मागणी होती. अखेर जयकुमार रावल यांच्याकडे हा पदभार देण्यात आला. रावल हे गेल्या तीन टर्मपासून आमदार आहेत. सुरुवातीला ते शहादा-दोंडाईचा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर ते शिंदखेडा मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आले आहेत. विधीमंडळाच्या विविध समितींवर देखील ते कार्यरत आहेत. शिक्षण घेत असतांना इंग्लडमधील कार्डिफ विद्यापीठातून विद्यार्थी अधिसभेवर विजयी होणारे ते ब्रिटीशोत्तर पहिले विद्यार्थी आहेत.