वसुली संलग्नता दर २५० रुपये प्रति क्विंटल
By Admin | Updated: September 30, 2015 02:41 IST2015-09-30T02:41:27+5:302015-09-30T02:41:27+5:30
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २०१४-१५ या वर्षातील एफआरपीचे पैसे अदा करण्याकरिता सहकारी व खासगी साखर कारखान्यांना ज्या बँका कर्ज देतील

वसुली संलग्नता दर २५० रुपये प्रति क्विंटल
मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २०१४-१५ या वर्षातील एफआरपीचे पैसे अदा करण्याकरिता सहकारी व खासगी साखर कारखान्यांना ज्या बँका कर्ज देतील त्या कर्जास सरकारी हमी देऊन त्याची वसुली २०१५-१६ च्या गळीत हंगामातील साखर विक्रीद्वारे केली जाणार आहे. त्याकरिता प्रति क्विंटल वसुली संलग्नता दर (टॅगिंग) २०० रुपयांवरून २५० रुपये करण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे.
राज्यातील ९९ सहकारी तर ८९ खासगी साखर कारखान्यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षात े एफआरपीचे १९ हजार १०४ कोटी रुपये अदा करणे अपेक्षित असून त्यापैकी १६ हजार ६०२ कोटी रुपयांची देणी दिलेली आहेत. उर्वरित रक्कम देण्याकरिता ज्या बँका कारखान्यांना कर्ज देतील त्यांना सरकारच्यावतीने हमी दिली जाणार आहे.२०१५-१६ च्या हंगामातील साखर विकतील तेव्हा प्रति क्विंटल २०० रुपयांऐवजी २५० रुपये असा वसुली संलग्नता दर एस्क्रो अकाऊंटमध्ये जमा केले जातील, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.