मोबाइलद्वारे टॉयलेटमध्ये रेकॉर्डिंग करणारा अटकेत
By Admin | Updated: February 10, 2015 02:47 IST2015-02-10T02:47:03+5:302015-02-10T02:47:03+5:30
अंधेरीतल्या एका लाऊंजच्या लेडीज टॉयलेटमध्ये मोबाइल चिकटवून रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी सफाईकामगार गरीबनाथ

मोबाइलद्वारे टॉयलेटमध्ये रेकॉर्डिंग करणारा अटकेत
मुंबई : अंधेरीतल्या एका लाऊंजच्या लेडीज टॉयलेटमध्ये मोबाइल चिकटवून रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी सफाईकामगार गरीबनाथ राम याला अटक केली आहे. त्याच्या मोबाइलमध्ये अंबोली पोलिसांना एक आक्षेपार्ह क्लीप आढळली असून, पुढील चाचणीसाठी हा मोबाइल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत धाडण्यात आला आहे.
हा मोबाइल दोन महिन्यांपूर्वी लाऊंजमध्ये सफाईकामगार म्हणून रुजू झालेल्या गरीबनाथचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याने हा मोबाइल महिलांच्या अश्लील चित्रफिती काढण्यासाठी तेथे चिकटविल्याचे कबूल केले. त्याला भारतीय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. न्यायालयाने त्याला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली.
कुलाब्यात घडली दुसरी घटना
कुलाबा परिसरातील एका खासगी कंपनीच्या कार्यालयातही मोबाईलद्वारे स्वच्छतागृहात गेलेल्या महिलांच्या चित्रफिती रेकॉर्ड करणाऱ्या जाफर शेख(२६) नावाच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार शनिवारी समोर आला. महिला कर्मचारी स्वच्छतागृहातील शौचालयात असताना जाफर मोबाईलद्वारे रेकॉर्डींग करत असल्याचे तिला समजले. तिने हा प्रकार व्यवस्थापकाला सांगितला. त्याने जाफरचा मोबाईल चाळला तेव्हा त्यात आक्षेपार्ह क्लीप आढळली. त्याला कुलाबा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. (प्रतिनिधी)