मुंबईत विक्रमी मतदान, जाणून घ्या कुठे किती झाले मतदान
By Admin | Updated: February 21, 2017 18:15 IST2017-02-21T18:15:05+5:302017-02-21T18:15:12+5:30
राज्यातील दहा महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदेसाठी आज मदतान पार पडले. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगर पालिकेत 52.17 टक्के ऐवढे विक्रमी मतदान झाले आहे.

मुंबईत विक्रमी मतदान, जाणून घ्या कुठे किती झाले मतदान
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - राज्यातील दहा महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदेसाठी आज मदतान पार पडले. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगर पालिकेत 52.17 टक्के ऐवढे विक्रमी मतदान झाले आहे. गेल्या वेळच्या तुलनेत मतदारांचा आकडा वाढलेला दिसून आला. 2012 मध्ये मुंबईत 44.75 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 23 तारखेला निवडणूकीचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे.
राज्यातील इतर महानगरपालिकेती पाच वाजेपर्यंताचे आकडे - बृहन्मुंबई- 52.17, ठाणे- 53.11, उल्हासनगर- 46.83, नाशिक- 52.63, पुणे- 49.52, पिंपरी चिंचवड- 51.86,सोलापूर- 44.00, अमरावती- 51.62, अकोला- 42.39, नागपूर- 49.95