पालघर जिल्ह्यात विक्रमी पाऊस
By Admin | Updated: July 20, 2016 03:41 IST2016-07-20T03:41:25+5:302016-07-20T03:41:25+5:30
१९ जुलै पर्यंत या जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ११२४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली

पालघर जिल्ह्यात विक्रमी पाऊस
पालघर/नंडोरे : १९ जुलै पर्यंत या जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ११२४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून पालघर तालुक्यात सर्वाधिक सरासरी १२८७.८ मि.मी. इतकी तर त्या खालोखाल वसई ११५६.८, डहाणू ११३८, विक्रमगड ११०३, मोखाडा १०१७, तलासरी १०४३.६, जव्हार १०२४.४ मि.मी इतका पाऊस झाला तर सर्वात कमी वाडा तालुक्यात सरासरी ९३८.५ इतका झाला आहे. जिल्हयातील पालघर, वसई, डहाणू या तालुक्यात सर्वाधिक पाऊस असला तरी इतर तालुक्यात पडलेला हा समाधानकारक आहे. मागील वर्षीच्या १९ जुलै रोजीच्या तुलनेत यंदाचा हा पाऊस सरासरी ४९६.८ मि.मी इतका जास्त आहे.
विक्रमगड तालुक्यात दोन दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल सोमवारी सकाळपासून संततधार सुरु ठेवली. दुसऱ्या दिवशीही पूर्ण दिवस मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले़ यामुळे काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते़ तर तालुक्यातील कमी उंची असलेल्या पुलावरुन पाणी वाहत होते़
त्यामुळे गाव-खेडयापाडयातील रहीवाशांचा शहराशी संपर्कही काही काळ तुटला होता े लावणीकरीता आवश्यक असा पाऊस होत असल्याने या पावसाने शेतकरी वर्ग मात्र सुखावला असून त्यांनी लावणीच्या कामांवर जोर दिला आहे़ दरम्यान तालुक्यात दोन दिवसांत विक्रमगड १०० मि़ मि तर तलवाडा ७५ मि़ मि़ पावसाची नोंद करण्यांत आल्याचे तहसिलने सांगितले़ (वार्ताहर)
>वसई पूर्व भागात दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तानसा नदीला पूर आल्याने उसगाव भाताणे पूल पाण्याखाली जाऊन भाताणे, नवसई, आडणे, जाबुलपाडा. थल्याचापाडा, हत्ती पाडा, इ. गावांचा संपर्क तुटून या भागातील नागरिकांचे मोठे हाल झाले