शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

"राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक, २०२४-२५ मध्ये देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के मराहाराष्ट्रात’’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:55 IST

Devendra Fadnavis News: २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये विक्रमी परकीय गुंतवणूक आली असून, या वर्षात देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

देशाच्या आर्थिक प्रगतीचा विचार केल्यास महाराष्ट्र हा नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. तसेच गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये येणाऱ्या परकीय गुंतवणुकीचा वेगही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान, २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये विक्रमी परकीय गुंतवणूक आली असून, या वर्षात देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

याबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘’मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची (जानेवारी ते मार्च २०२५) आकडेवारी सुद्धा आता जाहीर झाली असून, आता या संपूर्ण वर्षांत मिळून महाराष्ट्राने १,६४,८७५ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. जी यावर्षी देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्के इतकी आहे. यावर्षी देशात आलेली गुंतवणूक ही १,२१,९२९ कोटी रुपये इतकी आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रात गेल्यावर्षीचा विचार केला तर यावर्षी त्यापेक्षा ३२ टक्के गुंतवणूक अधिक आली आहे. या शेवटच्या तिमाहीत २५,४४१ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या १० वर्षांतील रेकॉर्ड स्थापित करणारे वर्ष ठरले. अर्थात हा रेकॉर्ड आपण पहिल्या ९ महिन्यातच मोडला होता. मी महाराष्ट्रातील जनतेचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रInvestmentगुंतवणूक