पीक कर्जांचे त्वरित पुनर्गठन करा : बापट

By Admin | Updated: June 30, 2016 01:27 IST2016-06-30T01:27:11+5:302016-06-30T01:27:11+5:30

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे.

Reconstitution of crop loans instantly: Bapat | पीक कर्जांचे त्वरित पुनर्गठन करा : बापट

पीक कर्जांचे त्वरित पुनर्गठन करा : बापट


पुणे : शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांना कर्ज मिळाले पाहिजे, यासाठी कर्जवाटपाची गती वाढवा, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे दिल्या.
बापट यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात खरीप हंगाम २०१५ मधील थकीत पीक कर्जाच्या पुनर्गठनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
या वेळी आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, विभागीय सहनिबंधक संतोष पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संजयकुमार भोसले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या वेळी बापट यांनी पुनर्गठित कर्जावरील प्रथम वर्षाचे शंभर टक्के व्याज व त्यापुढील चार वर्षांचे ६ टक्के दराने होणारे व्याज शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासन भरणार आहे.
हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा. बँकांनी पाऊस पडल्यावर कर्जवाटप करू, असा विचार करू नये, त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना तातडीने कर्जवाटप करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)
>आढावा बैठकीत
निर्देश राज्य सरकार भरणार व्याज

Web Title: Reconstitution of crop loans instantly: Bapat