शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

ओबीसींना पदोन्नतीत आरक्षणाची शिफारस १५ वर्षांपासून धूळखात; आजच्या बैठकीकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 06:44 IST

मंत्रिमंडळ उपसमितीने केली होती शिफारस

ठळक मुद्दे२००४ मध्ये राज्य शासनाने एक कायदा करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गास पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले. २०१४ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले आणि २०१९ मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार येऊनही ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण मिळाले नाही.पदोन्नतीतील आरक्षणाविरुद्ध याचिका करणारे राजेंद्र कोंढारे यांनी ७ मे रोजीचा आदेश कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

यदु जोशीमुंबई :  राज्य सरकारी नाेकऱ्यांमध्ये इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) पदोन्नतीमध्ये १९ टक्के आरक्षण द्यावे, अशी शिफारस २००६ मध्ये मंत्रिमंडळ उपसमितीने केलेली होती; पण ती आजवर धूळखात पडली आहे. नंतरच्या कोणत्याही सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही. तत्कालीन परिवहन मंत्री सुरूपसिंह नाईक यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने २००६ मध्ये राज्य मंत्रिमंडळाला अशी शिफारस केली होती की, ओबीसींना पदोन्नतीमध्ये १९ टक्के आरक्षण देण्यात यावे.

२००४ मध्ये राज्य शासनाने एक कायदा करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गास पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले. मात्र, ओबीसींना हे पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळाले नाही. तेव्हाचे सत्तारूढ पक्षांतील नेते (काँग्रेस-राष्ट्रवादी) आणि भाजपच्या नेत्यांनी ओबीसींनाही पदोन्नतीत आरक्षण देण्याची मागणी लावून धरल्यानंतर सुरूपसिंह नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली आणि या समितीने ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण देण्याची शिफारस स्पष्ट शब्दांत केली होती. त्यानंतर २००९ मध्ये पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले. २०१४ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले आणि २०१९ मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार येऊनही ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण मिळाले नाही.

...तर ओबीसींवर अन्याय  राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी ओबीसींना पदोन्नतीत आरक्षणाची मागणी केली. ओबीसी सोडून इतर सर्व मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षणाची भूमिका घेणे हा अन्याय असल्याचे ते म्हणाले.

आजच्या बैठकीकडे लक्षपदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या ७ मे रोजीच्या निर्णयासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी बैठक घेणार आहेत. पदोन्नतीत ३३ टक्के आरक्षण पूर्वीसारखे कायम ठेवणार की सर्व पदोन्नती या सेवाज्येष्ठतेनुसारच करण्याच्या निर्णयावर शासन ठाम राहणार, याबाबत उत्सुकता आहे. ७ मे रोजीचा आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी मागासवर्गीय संघटनांनी केली असून, या मागणीसाठी ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. पदोन्नतीतील आरक्षणाविरुद्ध याचिका करणारे राजेंद्र कोंढारे यांनी ७ मे रोजीचा आदेश कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

अनुसूचित जाती-जमाती आदींना पदोन्नतीमध्ये दिलेले आरक्षण हायकोर्टाने रद्द ठरविले होते आणि प्रकरण आता सुप्रीम कोर्टात आहे. सरकारने ओबीसींनाही पदोन्नतीत आरक्षणाचा कायदा करावा आणि सर्व घटकांना आरक्षण मिळावे यासाठी भक्कमपणे बाजू मांडावी. - प्रा. हरी नरके, ज्येष्ठ विचारवंत

राज्य सरकारने ओबीसींची विभागणी करून व्हीजेएनटी, एसबीसींना पदोन्नतीत आरक्षण दिले; पण इतर ओबीसींना वंचित ठेवले. एका घटकाला देणे आणि दुसऱ्याला वंचित ठेवणे हे अन्यायकारक आहे. ओबीसींना तातडीने पदोन्नतीत आरक्षण दिले पाहिजे. - एकनाथ खडसे, माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते

ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण देण्याची मागणी अतिशय रास्त आहे. सर्व मागासवर्गीयांना सारखाच न्याय लावायला हवा. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असताना एकूणच आरक्षणाचा विषय हा संयमाने आणि सर्वांशी चर्चा करून हाताळण्याची गरज आहे.- छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती