एसटीच्या कामगार करारास मान्यता
By Admin | Updated: April 2, 2016 01:25 IST2016-04-02T01:25:57+5:302016-04-02T01:25:57+5:30
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २०१२ ते २०१६ या कालावधीतील कामगार करारास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली.

एसटीच्या कामगार करारास मान्यता
मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २०१२ ते २०१६ या कालावधीतील कामगार करारास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली.
रावते म्हणाले की, कामगार करारानुसार महामंडळातील वर्ग ३ आणि वर्ग ४मधील कर्मचाऱ्यांना वेतन आणि भत्ते दिले जातात. महामंडळाची आर्थिक स्थिती पाहून साधारणपणे दर चार वर्षांनी मान्यताप्राप्त संघटनेसोबत करार केला जातो.
एसटी महामंडळाच्या २०१२ ते १६ दरम्यानच्या कामगार कराराचा कालावधी ३१ मार्च २०१६ रोजी संपुष्टात आला. (विशेष प्रतिनिधी)