राज्यात 22 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता

By Admin | Updated: October 30, 2014 01:41 IST2014-10-30T01:41:46+5:302014-10-30T01:41:46+5:30

आरोग्य विज्ञान विद्यापीठाने राज्यात 22 नवीन महाविद्यालयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे. कौन्सिलची परवानगी मिळाल्यानंतरच पुढील शैक्षणिक वर्षापासून ही महाविद्यालये सुरू होतील.

The recognition of 22 new medical colleges in the state | राज्यात 22 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता

राज्यात 22 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता

संदीप भालेराव - नाशिक
आरोग्य विज्ञान विद्यापीठाने राज्यात 22 नवीन महाविद्यालयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे. कौन्सिलची परवानगी मिळाल्यानंतरच पुढील शैक्षणिक वर्षापासून ही महाविद्यालये सुरू होतील. 
मागील वर्षी प्राप्त झालेले अनेक प्रस्ताव निकष पूर्ण न केल्यामुळे फेटाळण्यात आले. यंदाही नवीन महाविद्यालये सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव मागविण्यात येत असून, ही प्रक्रिया डिसेंबरअखेर्पयत सुरू राहणार आहे. मागील वर्षीचे काही प्रस्ताव मात्र शासनदरबारी मान्यतेसाठी पडून आहेत. 
विद्यापीठाकडून दर पाच वर्षानी बृहत आराखडा तयार केला जातो. त्यानुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी सहा वैद्यकीय, तीन दंतवैद्यक, पाच आयुर्वेद, तीन बी.एस्सी. नर्सिग, तीन पोस्टबेसिक नर्सिग, एक युनानी आणि एक अॅडॉलॉजी स्पिच लॅँग्वेज पॅथॉलॉजी महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली. 
बृहत आराखडय़ानुसार अनेक जिल्ह्यांमध्ये विविध वैद्यकीय शाखांच्या महाविद्यालयांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात आणखी महाविद्यालये सुरू करण्याची आवश्यकता असताना तसे प्रस्ताव आलेले नव्हते. 2क्15-16 च्या आराखडय़ानुसार राज्यात आणखी 191 महाविद्यालयांची आवश्यकता आहे. 
 
शहराची हद्द 3क् किलोमीटर
च्पाच लाख लोकसंख्येमागे एक वैद्यकीय महाविद्यालय, असा निकष विद्यापीठाने  निश्चित केला आहे; परंतु शहरात दिवसेंदिवस मोठा भूखंड मिळणो कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेता शहराची व्याख्या करताना संबंधित शहराचे क्षेत्र 3क् किलोमीटर्पयत निश्चित केले आहे. त्यामुळे ग्रामीण भाग त्यात समाविष्ट होईलच; शिवाय भूखंडाचा प्रश्नदेखील निकाली निघू शकेल. 

 

Web Title: The recognition of 22 new medical colleges in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.