‘बंगाली देवदास’ चित्रपटाची दुर्मीळ प्रत मिळाली!

By Admin | Published: August 19, 2015 12:55 AM2015-08-19T00:55:06+5:302015-08-19T00:55:06+5:30

सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पी. सी. बरुआ दिग्दर्शित १९३५मधील बंगाली भाषेतील ‘देवदास’ चित्रपटाची प्रत मिळविण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला यश मिळाले आहे

Received the rare copy of 'Bengali Devdas' | ‘बंगाली देवदास’ चित्रपटाची दुर्मीळ प्रत मिळाली!

‘बंगाली देवदास’ चित्रपटाची दुर्मीळ प्रत मिळाली!

googlenewsNext

पुणे : सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पी. सी. बरुआ दिग्दर्शित १९३५मधील बंगाली भाषेतील ‘देवदास’ चित्रपटाची प्रत मिळविण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला यश मिळाले आहे. ‘देवदास’ या कादंबरीवर आधारित विविध भाषांमध्ये बनविल्या गेलेल्या चित्रपटांमधला हा पहिला बोलपट आहे. बांगलादेश चित्रपट संग्रहालयाकडून सोमवारी या चित्रपटाची डीव्हीडी एनएफएआयकडे सुपुर्द करण्यात आली असल्याची माहिती एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
बांगलादेशाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव मुर्तझा अहमद, बांगलादेश चित्रपट संग्रहालयाचे संचालक महम्मद हुसेन यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकाश मगदूम यांना ‘बंगाली देवदास’ची प्रत सुपुर्द केली. तर मगदूम यांनी त्यांना ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या भारतीय चित्रपटाची प्रत भेट दिली. विशेष म्हणजे आपल्या देशात कुठेही या चित्रपटाची प्रत उपलब्ध नसल्यामुळे भारतीय चित्रपट इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण दस्ताऐवज हाती मिळाला आहे.
याविषयी मगदूम म्हणाले, की बंगाली भाषेत हा चित्रपट सर्वप्रथम बनविला गेला असल्यामुळे बांगलादेश सरकारकडून ही प्रत मिळवण्यासाठी ३० वर्षांपासून चित्रपट संग्रहालय प्रयत्न करीत होते. भारतात या चित्रपटाची प्रत कुठेही उपलब्ध नाही. काही दिवसांपूर्वी कॅनबेरा चित्रपट महोत्सवादरम्यान बांगलादेश चित्रपट संग्रहालयाचे संचालक जहांगीर हुसेन यांचा ईमेलद्वारे पत्रव्यवहार सुरू होता.

Web Title: Received the rare copy of 'Bengali Devdas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.