एफआयआरची प्रत मिळणार ईमेल आणि वॉट्स अॅपवर
By Admin | Updated: November 9, 2015 17:31 IST2015-11-09T17:31:45+5:302015-11-09T17:31:45+5:30
पोलिस खात्यात तंत्रज्ञानाची मदत घेत काळानुरुप बदल घडवण्यासाठी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पुढाकार घेतला आहे.

एफआयआरची प्रत मिळणार ईमेल आणि वॉट्स अॅपवर
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - पोलिस खात्यात तंत्रज्ञानाची मदत घेत काळानुरुप बदल घडवण्यासाठी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पुढाकार घेतला आहे. तक्रारदाराला एफआयरची प्रत वॉट्स अॅप आणि ईमेलवर पाठवावी असे आदेशच दीक्षित यांनी राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत.
पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताच तक्रारदाराला तातडीने एफआयआरची प्रत द्यावी असा नियम आहे. मात्र यासंदर्भात नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तंत्रज्ञानाचा वापर करत भ्रष्टाचारावर लगाम लावणारे प्रवीण दीक्षित हे सध्या राज्याचे पोलिस महासंचालक आहेत. दीक्षित यांनी राज्यातील पोलिस खात्यालाही तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. यानुसार तक्रारदाराने मागणी केल्यास एफआयआरची प्रत वॉट्स अॅप आणि ईमेलवरही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तक्रारदाराला एफआयरची हार्डकॉपी देणे बंधनकारक असतेच पण तातडीने सॉफ्ट कॉपी असल्यास तक्रारदारांना या सुविधेचा लाभ होईल.
संवेदनशील प्रकरणांमध्ये तक्रारदारांला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्यायचा नसेल तर त्यांना या डिजीटल सुविधेचा लाभ घेता येणार नाही. ग्रामीण भागातील इंटरनेट व स्मार्टफोन्स पोहोचल्याने ही योजना ग्रामीण भागातही यशस्वी होईल असा विश्वास पोलिस अधिका-यांनी व्यक्त केला.