पत्रास कारण की़़़

By Admin | Updated: January 25, 2015 01:21 IST2015-01-25T01:21:36+5:302015-01-25T01:21:36+5:30

‘सदा’ आनंदी, ‘भाव’स्पर्शी माणूस आणि संवाद साधण्यातच नित्यानंद मानणारा एक शिक्षक आपले उभे आयुष्य एका अनोख्या दातृत्वासाठी खर्ची घालत आहे.

Reason for the letter | पत्रास कारण की़़़

पत्रास कारण की़़़

कुंदन पाटील ल्ल जळगाव
‘सदा’ आनंदी, ‘भाव’स्पर्शी माणूस आणि संवाद साधण्यातच नित्यानंद मानणारा एक शिक्षक आपले उभे आयुष्य एका अनोख्या दातृत्वासाठी खर्ची घालत आहे. पत्रलेखनातून त्यांनी आतापर्यंत ३२ हजार मान्यवरांशी संवाद साधला आहे. आजही हे कार्य अव्याहत सुरू आहे.
सदानंद धडू भावसार असे या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव. पारोळा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये सेवेत असताना १९७६ पासून त्यांनी समाजासाठी लेखणी हातात घेतली. त्यांच्या अनेक पत्रांनी दु:खितांच्या अंत:करणावर आपुलकीची, मायेची फुंकर घातली आहे़ पत्रातील शब्दांनी कुणाला बळ दिले तर कुणाचा उत्साह दुणावला.
अनेक मान्यवरांनाही त्यांच्या अभिनंदनाच्या पत्रांनी उल्हसित, आनंदित केले आहे. अनेकांनी या उपक्रमाला दाद दिली आहे. त्यांनी पदरमोड करीत आतापर्यंत गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ३ लाख ३९ हजार ६८५ रुपयांच्या पुस्तकांसह रोख बक्षिसांचे वाटप केले आहे. ३१ डिसेंबर २०१४ पर्यंतचा त्यांनी हा हिशेबदेखील कागदावर मांडून ठेवलाय.
केवळ गुणवंतच नव्हे, तर वक्तृत्वाची धार असणाऱ्या ग्रामीण लेकरांनाही त्यांनी बळ दिले. विविध स्तरावर त्यांचा गौरव झाला आहे.

माणूस जोडण्यातच माझे आयुष्य आहे. मी
आधी अर्धा पगार आणि आता पेन्शनमधील निम्मे मानधन मान्यवरांशी संवाद साधण्यासाठी खर्ची घालतो; तरीही माझे कुटुंब आनंदात आहे. हा नित्यक्रम शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या सोबतच राहील.
- सदानंद धडू भावसार

पाठविलेली पत्रे - ३१,९९६. आलेली उत्तरे - ९,६४४
पत्रानंतर प्रत्यक्ष भेटीसाठी आलेले मान्यवर - २५१
व्यक्ती/संस्थांना मदत - १,३०,६३३ रुपये
दहावी, बारीवीतील गुणवंतांना बक्षिसे - १,०३, ६६७ रुपये
वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पुस्तके वाटप - ५७,५६० रुपये
इतर प्रोत्साहनपर बक्षिसे - २३,०९५ रुपये
पत्रलेखनासाठीचा खर्च - २४,७३० रुपये

Web Title: Reason for the letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.