मनसेच्या पराभवाची कारणो भीषण
By Admin | Updated: November 2, 2014 01:44 IST2014-11-02T01:44:05+5:302014-11-02T01:44:05+5:30
विधानसभा निवडणुकीमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) पराभव हा पक्षाच्या परफॉर्मन्सशी संबंधित नव्हता. मनसे या पक्षाशी किंवा पदाधिकारी यांच्याशीही त्याचा संबंध नाही.

मनसेच्या पराभवाची कारणो भीषण
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) पराभव हा पक्षाच्या परफॉर्मन्सशी संबंधित नव्हता. मनसे या पक्षाशी किंवा पदाधिकारी यांच्याशीही त्याचा संबंध नाही. मनसेच्या पराभवामागे काही भीषण कारणो आहेत, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे भेट दिल्यानंतर नगर येथे प्रथमच ते प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. या वेळी मनसेच्या पराभवाचे विश्लेषण करताना राज म्हणाले, पराभवामागे नेमकी कोणती कारणो आहेत, त्याचा खोलवर जाऊन शोध घेत आहे. त्यासाठी राज्यभर कार्यकत्र्याशी संवाद साधत आहे. कार्यकर्ते मला भेटायला येत होते, त्याऐवजी मीच त्यांना जाऊन भेटतो आहे. प्रत्येक ठिकाणच्या कार्यकत्र्याशी संवाद साधून पराभवाच्या कारणांची माहिती घेत आहे. त्यानंतरच त्याविषयी जाहीरपणो बोलणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
नवे मुख्यमंत्री चांगले
नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक वर्षापासून ओळखतो आहे. ते एक चांगले व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे राज्याच्या प्रगतीची त्यांच्याकडून आशा आहे. त्यासाठी त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. मात्र त्यांनी कामे वेगाने केली पाहिजेत, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. टोलबाबत मनसेचे पूर्वीचे जे धोरण आहे, तेच कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केल़े
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
राज ठाकरे यांनी शनिवारी जवखेडे खालसा येथे तिहेरी हत्याकांडातील पिडीत जाधव कुटुंबियांचे सांत्वन केल़े तुमच्या दु;खात आम्ही सहभागी आहोत़ धीर धरा, पोलीस निश्चित तपास लावतील.या प्रकरणाबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितल़े राज यांनी जाधव कुटुंबियांना एक लाख रुपयांची मदत दिली.