महाराष्ट्राचं वास्तव: १,२१७ माता अन् १६,००० बालमृत्यू; तरीही लस का नको?

By सोमनाथ खताळ | Published: August 24, 2023 09:43 AM2023-08-24T09:43:28+5:302023-08-24T09:43:53+5:30

आकडा मोठा असून नकार देणाऱ्यांची संख्या चिंता वाढविणारी आहे

Reality of Maharashtra 1,217 maternal and 16,000 child deaths Why not a vaccine anyway | महाराष्ट्राचं वास्तव: १,२१७ माता अन् १६,००० बालमृत्यू; तरीही लस का नको?

महाराष्ट्राचं वास्तव: १,२१७ माता अन् १६,००० बालमृत्यू; तरीही लस का नको?

googlenewsNext

सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. हेच मृत्यू टाळण्यासाठी शासनाने ‘मिशन इंद्रधनुष्य’ या मोहिमेचा पहिला टप्पा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान राबविला. यात राज्यातील २ लाख ७५ हजार बालकांनी आणि ५६ हजार मातांनी लस घेतली. हा आकडा मोठा असला तरी नकार देणाऱ्यांची संख्याही चिंता वाढविणारी आहे. ० ते ५ वयोगटातील ६ हजार ७२६ बालके आणि १८१ गर्भवतींनी लस घेण्यास नकार दिला आहे. यांचे समुपदेशन करूनही आरोग्य विभाग थकला आहे.

२०२२-२३ या वर्षात राज्यात १,२१७ माता आणि १६,८७५ मातांचा मृत्यू झाला होता. तसेच राज्यातील ३७ हजार ५६२ बालके आणि ३ हजार ११० गर्भवती अजूनही लसीकरणापासून दूर पळत असल्याचे समोर आले आहे.

नाही म्हणजे नाहीच....

आरोग्य विभाग नकार देणाऱ्या प्रत्येकाच्या दारी पोहोचला. परंतु त्यांनी दुष्परिणाम, आरोग्य विभाग आणि शासनावरील अविश्वास व बेफिकिरी यामुळे लस देण्यास गेलेल्या आरोग्य विभागाला परतवून लावल्याचे सांगण्यात आले. कितीही समुपदेशन केले तरी त्यांनी नाही म्हणजे नाहीच, अशी भूमिका घेतली आहे.

अशी आहे आकडेवारी

  • एकूण लसीकरण सत्र    २८,३६१ 
  • ० ते ५ वर्षे लाभार्थी    २,३९,८६३ 
  • ० ते ५ वर्षे लसीकरण    २,७५,३३५
  • गरोदर माता लाभार्थी    ४१,८०८
  • गरोदर माता लसीकरण    ५६,५९२


साडेसहा हजार बालके, १८१ गर्भवतींचा लस घेण्यास नकार

  • कारणे     बालके       गरोदर माता 
  • घरबंद असणे    १०,२७०     १,६२४
  • आजारी असणे    १०,४९८     ४८७ 
  • भीती                       ४९४     २८ 
  • इतर कारणे    ११,९६७     ७३५


कधी द्यावी लस?

मुलांना जन्मतः हिपेटायटिस बी, बीसीजी, दीड, अडीच व साडेतीन महिन्याला ओपीव्ही रोटा व पेन्टा, दीड, साडेतीन व नऊ महिन्याला आयपीव्ही व पीसीव्ही, नऊ महिन्याला व दीड वर्षाला एमआर जेई व अ जीवनसत्त्व, दीड वर्षाला ओपीव्ही व डीपीटी, पाच वर्षाला डीपीटी, दहा व सोळाव्या वर्षाला टीडी अशा लस दिल्या जातात. 

Web Title: Reality of Maharashtra 1,217 maternal and 16,000 child deaths Why not a vaccine anyway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.