शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

महाराष्ट्र केसरीपेक्षा हिंद केसरी व्हायला आवडेल; शरद पवारांविरोधात जानकरांनी थोपटले दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 16:03 IST

जानकरांचं शरद पवारांना खुलं आव्हान

मुंबई: भाजपानं जागा सोडल्यास शरद पवारांविरोधात निवडणूक लढवायला तयार असल्याचं म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दंड थोपटले आहेत. महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी व्हायला मला जास्त आवडेल, अशा शब्दांमध्ये जानकरांनी पवार यांना थेट आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची दाट शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर जानकर यांनी पवारांना आव्हान दिलं आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून सुप्रिया सुळेंना आव्हान देणाऱ्या जानकर यांनी आता शरद पवारांविरोधात निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं. 'मी बारामती आणि माढामधून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दिला आहे. बारामतीत यंदा कमळ फुलेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मात्र पाच मिनिटांच्या मुलाखतीत हा मतदारसंघ मिळवू. मुख्यमंत्री आमचं म्हणणं ऐकतील याची खात्री आहे,' असंदेखील जानकर म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडे सहा जागांची मागणी करणार असल्याचं जानकर यांनी सांगितलं. गेल्या लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना कडवी टक्कर दिली होती. जानकर यांनी भाजपाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवावी, असा आग्रह त्यावेळी भाजपाकडून करण्यात आला होता. मात्र जानकर यांनी रासपच्या कपबशी या चिन्हावर निवडणूक लढवली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये ते आघाडीवरदेखील होते. मात्र त्यानंतर सुळेंनी बाजी मारली. माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात काँग्रेसच्या बाजूनं वातावरण असताना शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी शरद पवार सोशलिस्ट काँग्रेसकडून रिंगणात होते. मात्र सहानभूतीची लाट असूनही काँग्रेसला हा मतदारसंघ जिंकता आला नव्हता. आताही हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच आहे. विजयसिंह मोहिते-पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.   

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीMahadev Jankarमहादेव जानकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९NCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा