शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर शासनदरबारी वकिली करायला तयार : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 14:17 IST

...तर ‘मी पुन्हा येईन.

ठळक मुद्दे तीर्थक्षेत्र आळंदीत जोग महाराज पुण्यतिथी जन्मशताब्दी सोहळ्यास भेट

आळंदी : सत्तेत असो किंवा नसो; आपण नेहमी सत्कार्य करत राहणार. त्यामुळे वारकरी शिक्षण संस्था संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी वारकरी संप्रदायाची वकिली करायला आपण तयार आहे. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांच्या समस्या महाविकास आघाडी सरकारकडे जाऊन पूर्ण करून घेऊ, अशी ग्वाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.स्वानंद सुखनिवासी सदगुरू विष्णुबुवा जोग महाराज जन्मशताब्दी सोहळ्यास सदिच्छा भेट देण्यासाठी रविवारी फडणवीस आळंदीत आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार बाबुराव पाचर्णे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, शांतीब्राम्ह ह. भ. प. मारुती महाराज कुर्हेकर, अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे, खजिनदार भालचंद्र नलावडे, शालिनी विखे पाटील, रामायणचार्य रामराव महाराज ढोक, अजित वडगावकर, मुख्याधिकारी समीर भूमकर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ज्ञानोबा-तुकोबारायांनी संपूर्ण विश्वाला व्यापक विचार दिला आहे. त्यामुळे भागवत धर्म संस्कृती जपून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. परिणामी त्याचा फायदा संस्कारी पिढी घडविण्यासाठी होत आहे. वारकरी संप्रदायात पुण्य करणाºयांची संख्या जास्त असल्याने कलियुग चालत आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीतील वारकरी संप्रदायाचे किंवा वारकरी शिक्षण संस्थेतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने विश्वस्त विकास ढगे पाटील व व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांनी प्रास्ताविक केले, तर भालचंद्र नलावडे यांनी सूत्रसंचालन केले......लोकांचा आशीर्वाद असेल तर ‘मी पुन्हा येईन’महाविकास आघाडी सरकारने आम्ही मंजूर केलेल्या अनेक मंजूर कामांना स्थगिती दिली आहे. मात्र आळंदीतील कामांना ही स्थगिती लावू नये. विकासकामांची स्थगिती उठविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. लोकांचा आशीर्वाद असेल तर ‘मी पुन्हा येईन’. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते. 

टॅग्स :AlandiआळंदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvarkariवारकरीGovernmentसरकार