काँग्रेस नेत्यांवर सुडाची कारवाई - अशोक चव्हाण
By Admin | Updated: February 2, 2016 03:41 IST2016-02-02T03:41:28+5:302016-02-02T03:41:28+5:30
महापालिका, नगरपालिका तसेच ग्रामपंचायत व अन्य स्थानिक निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवून काँग्रेस राज्यात अव्वलस्थानी आल्यामुळे भाजपा सरकारकाँग्रेसच्या नेत्यांवर सूड

काँग्रेस नेत्यांवर सुडाची कारवाई - अशोक चव्हाण
नांदेड : महापालिका, नगरपालिका तसेच ग्रामपंचायत व अन्य स्थानिक निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवून काँग्रेस राज्यात अव्वलस्थानी आल्यामुळे भाजपा सरकारकाँग्रेसच्या नेत्यांवर सूड भावनेतून कारवाई करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी
येथे केला.
नांदेड शहर व जिल्हा महिला काँग्रेस समितीच्या वतीने प्रगती महिला मंडळ सभागृहात आयोजित महिला काँग्रेस मेळावा तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी पिठाची गिरणीवाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
खा. अशोक चव्हाण म्हणाले, मागील निवडणुकीत ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रासह राज्यात सत्तेवर आलेले भाजपाचे सरकार सर्वच आघाड्यांवर अयशस्वी ठरले. सर्वसामान्य जनतेत भाजपा सरकारविरुद्ध तीव्र असंतोष
खदखदत आहे. शेतकऱ्यांनाही त्यांनी वाऱ्यावर सोडल्याने त्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढतच आहे, अशी टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)