संपुआच्या कामांचे री-ब्रॅण्डिंग

By Admin | Updated: October 12, 2014 01:42 IST2014-10-12T01:42:41+5:302014-10-12T01:42:41+5:30

कॉँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने औद्योगिक व विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रत महत्त्वपूर्ण प्रकल्प उभे केले. अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या.

Re-branding of UPA activities | संपुआच्या कामांचे री-ब्रॅण्डिंग

संपुआच्या कामांचे री-ब्रॅण्डिंग

>पुणो : कॉँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी  सरकारने औद्योगिक व विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रत महत्त्वपूर्ण प्रकल्प उभे केले. अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या. या योजनांवर स्वत:चा शिक्का मारून नरेंद्र मोदी सरकार री-ब्रॅण्डिंग करीत असल्याची टीका काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी शनिवारी केली. 
काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शर्मा पुण्यात आले होते.  यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, 85 लाख कोटी रुपये काळा पैसा विदेशात असल्याचा दावा त्यांनी केला. देशाच्या अर्थसंकल्पाच्या पाच पट असलेला हा काळा पैसा 1क्क् दिवसांत बाहेर काढू असे सांगितले. मात्र, त्यांनी काहीही केले नाही. कारण चुकीचे आरोप करणो, मोठे दावे करणो ही मोदी यांच्या प्रचाराची पद्धत आहे, अशी टीका त्यांनी केली.
मोदी म्हणतात, कॉँग्रेसने गेल्या 6क् वर्षात काय केले याचा हिशोब द्यावा. त्यांनी याबाबत माहिती घ्यावी. देशातील आयआयटी, आयआयएम, अंतराळ विज्ञान संस्था, अणुशक्ती संशोधन केंद्र ही सगळी 6क्च्या दशकात उभारली गेली. या सगळ्या संस्था पं. जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टी आणि विकासाच्या दृष्टीने उभ्या राहिल्या. माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे श्रेय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आहे.
 थोडीही शालीनता असेल तर या सगळ्या गोष्टी कॉँग्रेसने केल्या आहेत, असे सांगून ते माफी मागतील असे अपेक्षित होते, असे सांगून शर्मा म्हणाले, आता 1क्क् दिवसांचा हिशोब मागितल्यानंतर मोदी यांना राग येतोय. परंतु त्यांच्याकडून या सगळ्याचा हिशोब मागणो हे आमचे कर्तव्य आहे.
मोदींनी मंत्रिमंडळाची घटनात्मक चौकटच खिळखिळी करण्यास सुरुवात केली आहे, अशी टीका करून शर्मा म्हणाले, ‘मिनीमम गव्र्हमेंट व मॅक्ङिामम गव्र्हनन्स’ची घोषणा मोदी सरकारने केली होती. प्रत्यक्षात 1क्क् दिवसांत कमीतकमी गव्र्हनन्स आणि जास्तीतजास्त सत्तेचे केंद्रीकरण सुरू केले आहे. कॅबिनेटमंत्र्यांचे अधिकार मोदी सरकारने मर्यादित केले आहेत. ‘मोदी बोले, मंत्रिमंडळ हले’ अशी परिस्थिती असल्याचे शर्मा म्हणाले. 
 
च्आमच्यावर भ्रष्टाचाराचे, स्कॅमचे आरोप करणा:या भाजपाकडे मार्केटिंगसाठी इतका मोठय़ा प्रमाणावर पैसा आला कोठून, असा सवाल करून आनंद शर्मा म्हणाले, लोकसभा निवडणुकीत तब्बल 23 हजार कोटी रुपये खर्च केला.
 
च्जाहिरातींच्या मायाजलात जनतेची दिशाभूल केली. प्रचंड साधनसंपत्ती वापरून विखारी प्रचार केला. आताही तसाच प्रचंड खर्च सुरू आहे. मी आजर्पयतच्या आयुष्यात प्रचारावर एवढा खर्च पाहिला नाही, असे ते म्हणाले.
 
च्न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये
तिकीट लावून सभा घेतली. एका उद्योगपतीने हजार-दोन हजार तिकिटे घेतली. त्यामुळे लोकसभेच्या सभांमध्ये दिसत होते, तेच चेहरे अमेरिकेतील गर्दीतही दिसत होते, असे सांगून शर्मा म्हणाले, एखाद्या परदेश दौ:याची सफलता म्हणजे काय? केवळ गर्दी जमविणो की प्रत्यक्षात काही हातात पडणो.
च्अमेरिकेबरोबर व्हिसाबाबत प्रश्न होते, तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबतचे करार होते. मोदींनी किती करार झाले हे सांगावे. असा एकतरी करार झाला का, असा सवाल त्यांनी केला.

Web Title: Re-branding of UPA activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.