आरएसएस ही रिझर्व बँकेची मुख्य शाखा - अशोक चव्हाण
By Admin | Updated: February 5, 2017 18:33 IST2017-02-05T18:32:02+5:302017-02-05T18:33:08+5:30
देशातील नोटाबंदी,कॅशलेस यासह आर्थिक विषयावरील सर्वच निर्णय आरएसएसच्या शाखेतून घेतले जातात

आरएसएस ही रिझर्व बँकेची मुख्य शाखा - अशोक चव्हाण
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 5 - देशातील नोटाबंदी,कॅशलेस यासह आर्थिक विषयावरील सर्वच निर्णय आरएसएसच्या शाखेतून घेतले जातात, त्यामुळे आरएसएस ही रिझर्व बँकेची मुख्य शाखा असल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोलापूरात केला आहे.
मुंबई व राज्यातील शिवसेना - भाजपची युती तोडणे हा युती सरकारचा दिखाऊपणा आहे. भाजपा व शिवसेनेचे नेते हे एकमेकांवर आरोप करून आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत असून निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणार आहेत, असं ते म्हणाले. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर कॉँग्रेसची एकहाती सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
काल कॉंग्रेसपक्षाकडून निवडणुकीच्या प्रचारसभांचा शुभारंभ झाला त्यासाठी चव्हाण सोलापुरात आले होते. सकाळी मुंबईकडे निघताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आरोप केले.