शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सहकारी बँकांच्या संचालकांवरही आरबीआय कारवाई करु शकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 17:47 IST

बँकींग कायद्यात होणार बदल

ठळक मुद्देसहकारी बँक संघटना, बँकींग तज्ज्ञांकडून निर्णयाचे स्वागतलेखापरीक्षण होणार आरबीआयच्या नियमानुसार : अनास्कर

पुणे : बँकींग नियमन कायद्यामधे बदलास केंद्रीय मंडळाने मान्यता दिल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) सहकारी बँकेच्या संचालकावर, अधिकाऱ्यावर आणि संचालक मंडळावर देखील थेट कारवाई करण्याचे अधिकार मिळणार आहे. या अधिकारानंतरही सहकारी बँकेवर सहकार आयुक्त आणि आरबीआय असे दुहेरी नियंत्रण असणार आहे. बँकींग नियमन कायद्यामधे सुधारणा करण्यास केंद्रीय मंडळाने मान्यता दिली आहे. सहकारी बँकांची नोंदणी राज्याच्या सहकार कायद्यान्वये होत असली तरी त्यांना मिळणारा बँकींग परवाना हा बँकींग नियमन कायद्यानुसार दिला जातो. त्यावर सहकार खाते आणि आरबीआयचे नियंत्रण असते. आरबीआयला या पुर्वी बँकेच्या कोणत्याही एका संचालकावर, संचालक मंडळावर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावत थेट कारवाई करण्याचे अधिकार नव्हते. आरबीआयला सहकार विभागामार्फत संबंधितांवर कारवाई करावी लागत होती. नवीन सुधारणांमुळे आरबीआयच्या तपासात दोषी आढळल्यास संबंधितांना कारणे दाखवा नोटी बजावून त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार मिळणार आहेत. त्यामुळे नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार संबंधित व्यक्तीला बाजू मांडायची संधी मिळेल. तर, दोषी अधिकारी आणि संचालकांना थेट निलंबित करण्याचे अधिकार आरबीआयला मिळतील. त्यामुळे संपूर्ण संचालक मंडळाची बरखास्ती करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे हा बदल सहकार क्षेत्रासाठी फायदेशीर असल्याचे महाराष्ट्र नागरी सहकारी महासंघाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले. आरबीआय सहकारी बँकांवर थेट परवाना निलंबन अथवा निर्बंध लादण्याची कारवाई करीत होती. त्यामुळे संपूर्ण सहकारी बँकिग क्षेत्राची विश्वासार्हता काळवंडली जात होती. कायद्यातील प्रस्तावित बदलामुळे सहकारी बँका दोषमुक्त होऊ शकतील. लेखापरीक्षणासाठी आरबीआय निकष लागू करणार असल्याने सहकारी बँका व रिझर्व्ह बँकेतील विवाद कमी होतील अशी अपेक्षा आहे. बँकिंग नियमन कायद्यात सुधारणा करताना वाद सोडवणुकीसाठी लवाद उभारण्याची तरतूद केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया रुपी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित यांनी दिली. ----------------------

लेखापरीक्षण होणार आरबीआयच्या नियमानुसार : अनास्करसहकारी बँकांचे लेखापरीक्षण सहकार कायद्यानुसार होत होते. आरबीआयच्या नियमानुसार होईल. तसे,  नागरी बँकांमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेमणुका देखील शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि निकषांवर आरबीआयच्या पूर्वपरवानगीने होईल. त्यामुळे नागरी बँकांचा कारभार सुधारण्यास मदत होईल, असे महाराष्ट्र नागरी सहकारी महासंघाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँक