शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

४ जागा, २५ इच्छूक; राज्यसभेसाठी भाजपाचे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब? रविंद्र चव्हाण म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 18:50 IST

Rajya Sabha Election 2025: भाजपा नेतृत्त्व कोणाची निवड करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे.

Rajya Sabha Election 2025: राज्यातून निवडून देण्याच्या राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र या एका जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असून, त्यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या वाट्याला चार जागा येणार असून, यासाठी २५ नेते इच्छूक असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात भाजपाच्या कोअर कमिटीची एक बैठकही झाली होती. याबाबत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

रविंद्र चव्हाण दिल्लीत असून, पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. राज्यसभेसाठी इच्छुक असलेल्या २५ जणांच्या नावाची यादी कोअर कमिटीच्या बैठकीत फायनल करण्यात आली होती. ही २५ जणांच्या नावाची यादी घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तातडीने दिल्लीत दाखल झाले होते. या नावावर शुक्रवारी दिल्ली दरबारी चर्चा झाली. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर या चार नावांची घोषणा दिल्लीतून २ मार्च रोजी करण्यात येणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्याबाबतचा निर्णय भाजपाची केंद्रीय समिती घेणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

या बाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार

भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फायनल करण्यात आलेल्या नावांवर दिल्लीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या बाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे समजते. या नावांमधून भाजप नेतृत्त्व कोणाची निवड करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दोन दिवसापूर्वी राज्यात झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, आशिष शेलार, अमित साटम उपस्थित होते. भाजपच्या या यादीत विनोद तावडे, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, विजया रहाटकर, डॉ. भारती पवार, प्रीतम मुंडे, दिलीप कांबळे, अमर साबळे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, कुणाल पाटील, माधव भांडारी अशी काही नावे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे. 

 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाRavindra Chavanरविंद्र चव्हाणBJPभाजपा