शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"गुलाबराव पाटील यांच्या निष्ठेबाबत पाच-सहा वर्षापासून शंका", रावेर शिवसेना संपर्कप्रमुख विलास पारकर यांचा गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 08:34 IST

Gulabrao Patil: जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निष्ठेबद्दल आपल्याला पाच- सहा वर्षापासून शंका आली होती. सत्तेचा लाभ शिवसेनेच्या  कार्यकर्त्यांना देण्याऐवजी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनाच दिला, असे माझे निरीक्षण होते असा गौप्यस्फोट शिवसेनेचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर  यांनी येथे बोलताना केला.

जळगाव - जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निष्ठेबद्दल आपल्याला पाच- सहा वर्षापासून शंका आली होती, सत्तेचा लाभ शिवसेनेच्या  कार्यकर्त्यांना देण्याऐवजी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनाच दिला, असे माझे निरीक्षण होते. माझ्या या अहवालावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असतानाच त्यांच्यासह राज्यातील आमदारांनी बंडखोरी करण्याचा धक्कादायक प्रकार घडला, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर  यांनी येथे बोलताना केला.

रावेर येथील विवेकानंद विद्या मंदिराच्या सभागृहात रविवारी आयोजित रावेर व यावल तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पारकर म्हणाले की, ज्यांना सारे शिवसैनिक ढाण्या वाघ म्हणत होते, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठीच काम केले. शिवभोजन थाळीची कंत्राटे तसेच अन्य शासकीय कामांचे कंत्राटेही त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच दिली. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा त्यांनी विचारही केला नाही.

याबाबतची माहिती मला होती, संधी मिळेल तेव्हा गुलाबराव पाटील पक्ष सोडून जातील, असे माझे निरीक्षण मी पक्षश्रेष्ठींकडे लेखी स्वरूपात दिले होते. ते भाजपधार्जिणे असल्याचे आपली शंका खरी ठरली.  त्यामुळेच आपण कधीही गुलाबराव पाटलांकडे पक्ष वाढीचा किंवा कोणताही विषय घेऊन कधीही गेलो नाही, असेही पारकर यांनी सांगितले.

गुलाबराव पाटील यांच्याबद्दल शंका आल्यामुळेच जळगाव महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचा शिवसेनेतील प्रवेशाचा विषय देखील त्यांच्यापासून लांब ठेवण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या गटात गुवाहाटी येथे गेलेले आमदार हे त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी आणि ईडीची कारवाई टाळण्यासाठी गेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण