भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन रावसाहेब दानवेंची उचलबांगडी ?
By Admin | Updated: June 6, 2016 20:09 IST2016-06-06T18:29:26+5:302016-06-06T20:09:51+5:30
महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन रावसाहेब दानवे यांची उलबांगडी होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांकडून समजते.

भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन रावसाहेब दानवेंची उचलबांगडी ?
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन रावसाहेब दानवे यांची उलबांगडी होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांकडून समजते.
महाराष्ट्रात भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी दोनदा निवड झालेल्या रावसाहेब दानवे यांच्याविरोधातील तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे यावर पडदा पाडण्यासाठी भाजपाकडून त्यांना राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवून पुन्हा दिल्लीत बोलविण्याचा विचार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
रावसाहेब दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन उलबांगडी करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.