शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी रावसाहेब दानवेंनी सुचवला 'हा' फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 17:05 IST

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दोन्ही पक्षांमधील मतभेद दूर करून सरकार स्थापन करण्यासाठी एक फॉर्म्युला सुचवला आहे.

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतील स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात  सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी धरलेला आग्रह आणि भाजपाने सत्तास्थानांच्या समसमान वाटपाबाबत घेतलेली आडमुठी भूमिका यामुळे अद्याप नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दोन्ही पक्षांमधील मतभेद दूर करून सरकार स्थापन करण्यासाठी 1995 चा फॉर्म्युला सुचवला आहे. आम्ही या फॉर्म्युल्यावर काम करू आणि राज्यात भाजपा आणि शिवसेनेचे सरकास स्थापन होईल, असे दानवे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगावर बोलताना दानवे म्हणाले की, ''महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला जनादेश मिळाला आहे. आमच्यामध्ये कोण्यातील प्रकारचे भांडण नाही आहे. आमच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत. ते आम्ही एकत्र बसून चर्चा करून सोडवू. दरम्यान, आम्ही 1995 च्या सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर विचार करत असून, राज्यात भाजपा आणि शिवसेनेचेच सरकार स्थापन होईल.'' 

1995 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे तत्कालीन बडे नेते प्रमोद महाजन यांच्यात युतीचा एक फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार सर्वाधिक जागा असणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री आणि तर कमी जागा असणाऱ्यांकडे उपमुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाची खाती राहतील, असे निश्चित झाले होते. दरम्यान, आता अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडून शिवसेना या फॉर्म्युल्यावर राजी होते का हे पाहावे लागेल. 

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या राजकीय  नाट्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर फडणवीस यांनी राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल, असे सांगितले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात लवकर नवं सरकार स्थापन होईल, सत्ता स्थापनेबाबत कोण काय बोलतंय यावर बोलणार नाही असं सांगत महाराष्ट्राला नवीन सरकार देण्याची आवश्यकता आहे. लवकरच सरकार स्थापन करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण विशेषत: या प्रतिक्रियेवेळी मुख्यमंत्र्यांनी महायुतीचा उल्लेख टाळल्याचं दिसून आलं. त्यामुळे राज्यात सरकार कुणाचे स्थापन होणार याबाबत आणखी गूढ वाढलं आहे.  तसेच सत्ता स्थापनेवर बरेच जण बोलत आहेत. मात्र आम्ही त्यावर बोलणार नाही, भाजपाकडूनही कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ४० मिनिटे चर्चा झाली. यावेळी फक्त देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाच उपस्थित होते. त्यामुळे राज्यात भाजपा-शिवसेना यांच्यातील तणाव वाढत चालल्याचं दिसून येत आहे. संध्याकाळी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात भेट होणार आहे. या भेटीनंतर आघाडीची भूमिका स्पष्ट होईल त्यामुळे भाजपादेखील या सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे आणखी काही काळ वेळकाढूपणाची भूमिका भाजपाने घेतल्याचे दिसतंय. महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी: शरद पवार मुख्यमंत्री होणार?; 'असा' ठरला सत्तावाटपाचा फॉर्म्युलाशरद पवारांच्या तालमीत तयार होण्याची आदित्य ठाकरेंना संधी ?

'नाय, नो, नेव्हर'... अमित शाह - देवेंद्र फडणवीस भेटीनंतर भाजपाला शिवसेनेविरोधात नवी 'पॉवर' 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण