शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

"ही सर्व मुघली संस्कृती, भारतीय संस्कृतीत..."; PM मोदींच्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भातील राऊतांच्या विधानावर फडणवीस स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:25 IST

"भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो. ही सर्व मुघली संस्कृती आहे की, वडिल जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुढीपाड्यानिमित्त नागपुरातील संघ कार्यालयात पोहोचले होते. येथे त्यांनी संघाचे संस्थापक तथा पहिले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना आदरांजली अर्पण केली. यानंतर ते संघाच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. त्यांच्या या दौऱ्यासंदर्भात राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगत आहे. यातच, शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या संदर्भात मोठा दावा केला होता. "पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारसदार संघ ठरवेल आणि तो महाराष्ट्रातून असेल," असे विधानन राऊतांनी केले होते. यानंतर, आता "भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो. ही सर्व मुघली संस्कृती आहे की, वडिल जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो -यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मोदीजी यांचा उत्तराधिकारी शोधण्याचे कुठलेही कारण नाही. मोदीजी आमचे नेते आहेत. आणखी बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत. आमचा आग्रह आहे. आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघत आहोत. संपूर्ण देश बघतो आहे. त्यामुळे आता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो. ही सर्व मुघली संस्कृती आहे की, वडिल जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात. त्यामुळे अत्ता कुणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही. तसा प्रश्नही नाही."

नेमकं काय म्हणाले होते राऊत? -एका पत्रकार परिषदेदरम्यान, मोदींचे वारसदार कोण असतील? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले होते, "यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्णय घेईल, असे दिसते. यावर, मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच बघायला मिळेल? असा प्रश्न केला असता राऊत म्हणाले होते, यामुळेच मोदींना काल बोलाऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. तसेच, संघाची चर्चा ही बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही. तरीही काही संकेत जे असतात, ते स्पष्ट आहेत. पुढचा नेता संघ ठरवेल आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल." 

ही काही साधी गोष्ट नाही... -तसेच, "जी माहिती बाहेर येत आहे, ती स्पष्ट आहे की, सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी जे धोरण जाहीर केले आहे की, 75 वर्षं झालेल्या व्यक्तीने सत्तेच्या कोणत्याही पदावर राहू नये. यामुळे सरसंघचालकांनी त्यांना या त्यांच्या भूमिकेची अथवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा केली. की आता आपली वेळ आली आहे. सप्टेंबर महिना येतो आहे. तेव्हा देशाचे नेतृत्व बदलावे लागेल. ज्या अर्थी पंतप्रधान मोदींना 10-11 वर्षांनंतर नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटावे लागले, ही काही साधी गोष्ट नाही, असेही राऊत यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ