रत्नागिरीच्या प्राध्यापकाचे पाकीट लंपास करण्याचा प्रयत्न फसला!
By Admin | Updated: May 19, 2017 00:47 IST2017-05-19T00:47:02+5:302017-05-19T00:47:02+5:30
अकोला : शेगावकडे जाणाऱ्या बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचे पैशाचे पाकीट लंपास करण्याचा प्रयत्न फसला.

रत्नागिरीच्या प्राध्यापकाचे पाकीट लंपास करण्याचा प्रयत्न फसला!
अकोला : शेगावकडे जाणाऱ्या बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचे पैशाचे पाकीट लंपास करण्याचा प्रयत्न फसला.
ही घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकात घडली.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील प्रा. महेंद्र विठ्ठलराव जाधव (३७) हे शेगावला जाण्यापूर्वी अकोल्यात मुक्कामाला थांबले होते. गुरुवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ते शेगावकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना त्यांचे पाकीट अज्ञात चोरट्याने मारले. पाकीट लंपास झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी सिव्हील लाईन पोलीस स्टेशन गाठले. ठाणेदार अन्वर शेख व त्यांचे सहकारी बस स्थानकात दाखल झाले. पोलीस आपला शोध घेत असल्याचे लक्षात येताच चोरट्याने पैशासहीत पाकीट बस स्थानकावरच टाकून पळ काढला. पोलिसांनी हे पाकीट प्रा. जाधव यांना परत केले.