शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 16:28 IST

पालकमंत्री असूनही उदय सामंत यांनी आघाडी मिळवून दिली नाही असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला होता

Nilesh Rane VS Uday Samant : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे हे विजयी झाले आहेत. मात्र निकालावरुन राणे पुत्रांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. निलेश राणेंनी मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधु किरण सामंत यांच्याबाबत धक्कादायक विधान केले. किरण सामंत हे या निवडणुकीत उद्धव अन् रश्मी ठाकरेंना भेटले, असा मोठा दावा भाजपचे युवा नेते निलेश राणेंनी केला होता. तसेच पालकमंत्री असूनही उदय सामंत हे नारायण राणेंना आघाडी का मिळवून देऊ शकले नाहीत असाही सवाल निलेश राणे केला होता. आता राणेंच्या या प्रश्नाला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच निलेश राणे यांनी शिंदे गटाच्या मतदारसंघाबाबत केलेल्या विधानावरूनही उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे.

खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी किरण सामंत यांच्यावर आरोप केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यावरही जोरदार टीका केली. पालकमंत्री असूनही उदय सामंत हे नारायण राणेंना लीड का देऊ शकले नाहीत हे सांगावं. सामंत जे वागले ते आम्ही कधीही विसरणार नाही. आम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेऊन आहोत, राणे कुणालाच माफ करत नाहीत असे म्हणत निलेश राणेंनी इशारा दिला होता.

"पालकमंत्री म्हणून त्यांनी जी डिलिव्हरी करायला हवी होती ती त्यांनी केली नाही. उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही मायनस आहोत. उदय सामंत यांनी लीड का दिलं नाही ते त्यांनी सांगावं. आम्ही रत्नागिरीमधून मताधिक्याची अपेक्षा ठेवली होती. उदय सामंत एक सिनियर लीडर आहेत, पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत," असं निलेश राणे यांनी म्हटलं होतं. 

दुसरीकडे नारायण राणे यांच्या विजयानंतर नितेश राणेंनी उदय सामंत यांच्‍या रत्‍नागिरी तसेच राजापूर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला होता. यापुढे जात निलेश राणेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत रत्नागिरी मतदारसंघाबाबत भाष्य केलं. "नितेशने फक्त राजापूर मतदार संघावर भाजपचा दावा सांगितला. माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदार संघ पण पारंपारिक भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार," असं विधान निलेश राणेंनी केलं होतं.

या सगळ्या प्रकारावरुन आता शिंदे गटाने संताप व्यक्त केला आहे. निलेश राणेंच्या आक्षेपाला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "आम्ही सगळ्यांनी मिळून नारायण राणे यांना ७५ हजार मतांपर्यंत पोहोचवले होते. हे नारायण राणे यांनाही माहिती आहे. त्यामुळे माझा रत्नागिरी मतदारसंघ भाजपसाठी मागणे किंवा माझ्यावर आक्षेप घेणे याची सगळी तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालय आहे त्यातून त्यांनी माहिती घ्यावी. त्यातून उदय सामंत पालकमंत्री म्हणून कमी पडला असेल तर त्यांनी जाहीर करावे. लोकशाहीमध्ये कुठलाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे निलेश राणेंना मतदारसंघ मागितला असेल," असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Nilesh Raneनिलेश राणे Uday Samantउदय सामंतNitesh Raneनीतेश राणे