शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक निकाल 2019: विनायक राऊत आघाडीवर, निलेश राणे 51 हजार मतांनी मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 11:44 IST

ratnagiri-sindhudurg Lok Sabha Election 2019 live result & winner

सिंधुदुर्गः नारायण राणे आणि त्यांचा स्वाभिमान पक्ष या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून रिंगणात असून, राणे फॅक्टर पुन्हा चालणार का, याचीच सगळीकडे चर्चा आहे. शिवसेना-भाजपाची युती झाल्यामुळे विनायक राऊत, स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे आणि काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर अशी तिरंगी लढत असली तरी खरा मुकाबला हा निलेश राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्येच आहे. निलेश राणेंसह नारायण राणेंनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्यानं त्यांचा प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या. या निवडणुकीत विनायक राऊत यांचा निलेश राणेंच्या माध्यमातून थेट सामना नारायण राणेंशी असल्यानं ही निवडणूक चुरशीची झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत यांनी 12,6797 मतं मिळाली असून, निलेश राणे यांच्या पारड्यात 74,993 मतं पडली आहेत. विनायक राऊत हे 51 हजार 804 मतांनी आघाडीवर आहे. या मतदारसंघात 13,67,361 मतदार असून,  8 लाख 74 हजार 306 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच या मतदारसंघात 61.69 टक्के मतदान झालं होतं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी तब्बल 1 लाख 50 हजार 51 मतांनी निलेश राणे यांचा पराभव केला होता. शिवसेनेच्या विनायक राऊत यांना 49,3088 मतं मिळाली होती, तर निलेश राणे यांना 34,3037 एवढं मतदान झालं होतं.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग