रत्नागिरी-मुंबई गोवा महामार्गावर कार व बसची धडक, २ ठार
By Admin | Updated: May 25, 2016 00:17 IST2016-05-24T13:06:26+5:302016-05-25T00:17:57+5:30
रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावर लांजाजवळ वाकेड घाटात स्वीफ्ट कार आणि व्होल्वो बसची जोरदार धडक होऊन दोन जण जागीच ठार झाले

रत्नागिरी-मुंबई गोवा महामार्गावर कार व बसची धडक, २ ठार
>ऑनलाइन लोकमच
रत्नागिरी, दि. २४ - रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावर लांजाजवळ वाकेड घाटात स्वीफ्ट कार आणि व्होल्वो बसची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. मंगळवारी सकाळी रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावर स्वीफ्टगाडी ओव्हरटेक करत असताना समोरून आलेल्या व्होल्वोची धडक बसून हा अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून एकेरी वाहतुक सुरु आहे. महामार्ग पोलिस आणि लांजा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.