रत्नागिरी जिल्हा परिषदच नंबर वन!
By Admin | Updated: June 3, 2015 23:40 IST2015-06-03T22:21:56+5:302015-06-03T23:40:55+5:30
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ३२२१ कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण झाले. त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. त्याप्रमाणे

रत्नागिरी जिल्हा परिषदच नंबर वन!
रत्नागिरी : कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण झाले असून, रत्नागिरी जिल्हा परिषदेने या कामामध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. केवळ रत्नागिरी व अकोला या दोन जिल्हा परिषदांनी राज्यात सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण केले आहे.
जानेवारी, २०१५मध्ये शासनाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांना कर्मचाऱ्यांचे सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण करण्याचे सक्तीचे केले होते. मात्र, फेबु्रवारी व मार्च या महिन्यामध्ये वर्षअखेरच्या कामाची घाई असल्याने सेवा प्रणालीचे काम संथ गतीने करण्यात आले होते. शासनाने या कामाचा वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तरीही काम पूर्ण झालेले
नव्हते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी प्रेरणा देशभ्रतार रुजू झाल्या. त्यानंतर देशभ्रतार यांनी सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण झाल्याशिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येऊ नये, अशी सक्त सूचना त्यांनी वित्त विभागाला दिली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ३२२१ कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीचे काम पूर्ण झाले. त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. त्याप्रमाणे शासनाने रत्नागिरी व अकोला या दोन जिल्हा परिषदा या प्रणालीमध्ये राज्यात प्रथम असल्याचे जाहीर केले.मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी सेवार्थ प्रणालीबाबत कडक भूमिका घेतल्याने जिल्हा परिषदेला प्रथम क्रमाकाचा मान मिळाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)
सेवार्थ प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कमी-जास्त प्रमाण होणार नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन पध्दतीने वेळेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांचा संपूर्ण डाटा या प्रणालीमध्ये फीट झाल्यानंतर वेतन वेळेत होणार आहे.
नसेवार्थ प्रणाली अपूर्ण राहिल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले होते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन झाल्याशिवाय आपले वेतन जमा करु नये, अशी सूचना वित्त विभागाला दिली होती. त्याप्रमाणे देशभ्रतार यांनी स्वत:चे वेतन घेतलेले नाही.