शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नाकर बँकेच्या एटीएमवर दरोडा, साडेआठ लाख लुटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 14:10 IST

रत्नाकर बँकेच्या एटीएम सेंटरवर दरोडा टाकून साडेआठ लाख रोकड लंपास केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले.

ठळक मुद्देएटीएम सेंटरचे मशिन गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील शंभर, पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा घेवून दरोडेखोर पसार झाले आहेत.गेल्या पाच वर्षापासून हे मशिन फॅजॅक्ट ट्रॅकशन टेकनॉलॉजी या कंपनीचे आहे.

कोल्हापूर, दि. 2 -  कावळा नाका ते तावडे हॉटेल रोडवर मुक्त सैनिक वसाहत येथील रत्नाकर बँकेच्या एटीएम सेंटरवर दरोडा टाकून साडेआठ लाख रोकड लंपास केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. रस्त्यालगत असलेल्या या एटीएम सेंटरचे मशिन गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील शंभर, पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा घेवून दरोडेखोर पसार झाले आहेत. गॅस कटरमुळे मशिन आतून पूर्ण जळाले आहे.

अधिक माहिती अशी, ताराबाई पार्क येथील रत्नाकर बँकेचे (आर. बी. एल) एटीएम मशिन मुक्त सैनिक वसाहत येथील रस्त्याकडेला आहे. त्याच्या शेजारी टुरो ट्रॅव्हल्स अ‍ॅन्ड टुरर्सचे कार्यालय आहे. गेल्या पाच वर्षापासून हे मशिन फॅजॅक्ट ट्रॅकशन टेकनॉलॉजी या कंपनीचे आहे. कंपनीचे कॅशियर सुनिल चौगुले व प्रशांत मुच्छंडी यांनी मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मशिन तपासले असता त्यामध्ये ५ लाख ५० हजार रुपये होते. त्यामध्ये आणखी तीन लाखाची कॅश भरली. असे सुमारे साडेआठ लाख रुपये मशिनमध्ये होते. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पुन्हा कॅशिअर चौगुले व मुच्छंडी कॅश भरण्यासाठी याठिकाणी आले. 

बाहेरुन एटीएम सेंटरचे शर्टर बंद असल्याने त्यांना थोडी शंका आली. शर्टर उघडून पाहिले असता आतमध्ये मशिन फोडलेले दिसले. दरोड्याचा प्रकार दिसताच त्यांनी बँकेचे व्यवस्थापक महादेव चिकुर्डेकर यांना मोबाईलवरुन कळविले. त्यांनी काही प्रतिनिधींना तत्काळ घटनास्थळी पाठविले. एटीएम कंपनीचे प्रतिनिधी विनय हसबनिस आले. त्यांनी कंट्रोलरुमला फोनवर दरोड्याची माहिती दिली. 

स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे व शाहूपुरी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या पाठोपाठ शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आले. त्यांनी एटीएम सेंटरची पाहणी केली. झेबा श्वान घटनास्थळी आले. मशिन जळाल्यामुळे दरोडेखोरांच्या हाताचे ठसे मिळून आले नाहीत. दूर्गंधी सुटल्याने श्वान माघारी परतले. शहरातील व शहराबाहेरील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.असा टाकला दरोडा

कावळा नाका ते तावडे हॉटेल रोडवर नेहमी वाहनांची वर्दळ असते. रस्त्याला लागूनच हे एटीएम सेंटर असल्याने या मार्गावरुन ये-जा करणा-या लोकांच्या सहजासहजी नजरेस पडते. दरोडेखोरांनी रेकी करुन मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एटीएम सेंटरमध्ये घुसले. शर्टर बंद करुन आतील विज बंद केली. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेºयाची केबल काढून टाकली. गॅस कटरने मशिनची डावी बाजू उभी कापल्याने थेट कॅश ठेवलेली चार कॅशेटस त्यांच्या हाती लागले.त्यातील शंभर, पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा सॅकमध्ये भरुन ते साहित्यासह पसार झाले. गॅस कटरने मशिन कापल्याने त्याच्या ज्वालाग्रही ठिणग्या उडून मशिन आतमधून पूर्णत: जळाले. त्याची दूर्गंधी सुटली होती. हा प्रकार कोणाच्या लक्षात येवू नये म्हणून बाहेर पडताना त्यांनी पुन्हा शर्टर बंद करुन घेतले. सुमारे दोन तास दरोडेखोर आतमध्ये कॅश बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला.