रत्नागिरी आकाशवाणी केंद्र आजारी
By Admin | Updated: January 30, 2015 23:11 IST2015-01-30T23:04:38+5:302015-01-30T23:11:36+5:30
रेडिओ विक्रेते, दुरुस्ती करणारे व्यावसायिक, सेल विक्रेते, रेडिओ कंपन्या व त्यावर उदरनिर्वाह चालविणारे कुशल कारागीर ते अधिकारी आदी व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या सर्वांवर उपासमारीची वेळ

रत्नागिरी आकाशवाणी केंद्र आजारी
चिपळूण : रत्नागिरी येथील आकाशवाणी केंद्राची प्रक्षेपण क्षमता कमी झाल्यामुळे चिपळूण, खेड, गुहागर, दापोली, मंडणगड, संगमेश्वर या ६ तालुक्यातील रसिकांना विविध कार्यक्रमांपासून वंचित राहावे लागत आहे. चिपळूण या मध्यवर्ती ठिकाणी एफएमची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी खेर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. रत्नागिरी येथे आकाशवाणी केंद्र असून, रेंज अत्यंत कमी मिळत आहे. रेडिओवरील ताज्या बातम्या, शासकीय योजनांची माहिती या माध्यमातून मिळणे आता कालबाह्य होऊ लागले आहे. मुंबई सोडून अन्य कोठेही आकाशवाणी केंद्र नाही. पश्चिम किनाऱ्यावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने व आणिबाणीच्या वेळी आपत्कालीन मदतीसाठी संपर्कासाठी ही सेवा अत्यंत आवश्यक बाब आहे, असेही पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांना असणाऱ्या सेवा सुविधा प्राप्त न झाल्यामुळे राज्य व केंद्र शासनाच्या शेतीविषयक अन्य कोणत्याही धोरणांबाबत व योजनांपासून ६ तालुक्यातील जनता अनेक वर्षे वंचित राहिली आहे. रत्नागिरी तालुकावगळता रेडिओ विक्रेते, दुरुस्ती करणारे व्यावसायिक, सेल विक्रेते, रेडिओ कंपन्या व त्यावर उदरनिर्वाह चालविणारे कुशल कारागीर ते अधिकारी आदी व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. रत्नागिरी केंद्राची प्रक्षेपण क्षमता वाढविण्यासाठी योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. (वार्ताहर)