शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी मोदींच्या आॅपरेशन टेबलवर - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 05:36 IST

काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सद्यस्थितीत कोमात गेले आहे. ते भाजपला विरोध करताना दिसत नाही. काँग्रेसचे नेते ‘पॅरालाइज’ (स्तंभित) झाल्याने या पक्षाला आता केवळ त्यांचे जिल्हाध्यक्ष तारु शकतात.

अहमदनगर : काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सद्यस्थितीत कोमात गेले आहे. ते भाजपला विरोध करताना दिसत नाही. काँग्रेसचे नेते ‘पॅरालाइज’ (स्तंभित) झाल्याने या पक्षाला आता केवळ त्यांचे जिल्हाध्यक्ष तारु शकतात. काँग्रेस स्वत: काही करत नसल्याने त्यांनी निदान डाव्यांच्या आंदोलनांना साथ द्यायला हवी. त्यातून भविष्यात काँग्रेसला फायदाच होईल, असे भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़भटक्या विमुक्तांच्या राज्यस्तरीय परिषदेसाठी आंबेडकर नगर जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संपादकीय टीमशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेस नेतृत्वानेच आपल्या नेत्यांना शांत राहण्याचा आदेश दिला आहे की काय, अशी शंका वाटावी असे वातावरण आहे. चौकशीचा ससेमिरा पाठीशी लागण्याची भीती असल्यामुळे विरोधक म्हणून ते काहीच करत नाहीत. तर संपूर्ण राष्ट्रवादीच मोदींच्या ‘आॅपरेशन’ टेबलवर आहे. आॅपरेशन करुन हा पक्ष संपवायचा की जीवंत ठेवायचा हे मोदींच्या हातात आहे.त्यामुळे राष्टÑवादी भाजपविरोधात काहीच करु शकत नाही़ राज्यात भाजप विरोधात आघाडी उभी करण्याचा आमचा प्रयत्न राहील.राजू शेट्टींसह सर्वांचे यात स्वागत राहील. मात्र, शेट्टी भाजपशी पूर्ण काडीमोड घेणार की नाही हेअजून स्पष्ट नाही, असे आंबेडकर म्हणाले.चळवळीतूनच मिळेल पंतप्रधानपदाचा चेहराआत्ताच्या परिस्थितीत मोदींना सक्षम पर्र्याय देऊ शकेल, असा पंतप्रधान पदाचा चेहरा कुठल्याही पक्षाकडे नाही. नितीश कुमार यांची चर्चा होती, पण त्यांनी स्वत:ला त्यादृष्टीने कधीच तयार केले नव्हते. आता तर ते मोदींच्या तंबूत गेले आहेत. लालूप्रसाद निवडणूक लढवू शकत नाहीत. मायावती मोदींच्या विरोधात जातील, असे नाही. काँग्रेसकडेही सध्या हा चेहरा नाही. त्यामुळे पुढील दोन वर्षात जी जनआंदोलने उभी राहतील, त्यातूनच एखादा चेहरा समोर येईल. गुजरात निवडणुकीवर पुढील सर्व गणिते अवलंबून आहेत, असे भाकीत त्यांनी केले.सत्तेतील दलित नेत्यांचा समाजाला फायदा नाहीकेंद्रात रामदास आठवले यांना मंत्रिपद मिळून दलितांचा काहीही फायदा झालेला नाही. रा.सू. गवई, दादासाहेब रुपवते, सुशीलकुमार शिंदे सत्तेत होते. त्यामुळे दलित समाजाचा काय फायदा झाला? कोणी मंत्री झाला म्हणून समाज सुधारतो असे नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी