शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 10:48 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांचे डॉ. विजय दर्डा यांनी मानले आभार; आजपासून यवतमाळ येथे भव्य रामकथा यज्ञाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : श्रवणीय रामकथेसाठी यवतमाळ येथे येत असलेले जगविख्यात आध्यात्मिक गुरू, कथावाचक, राष्ट्रसंत मोरारी बापू यांना स्टेट गेस्ट अर्थात राज्य अतिथीचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शनिवारी (६ सप्टेंबर) यवतमाळ येथे हा रामकथा यज्ञ सुरू होत असून तो १४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी संत मोरारी बापू यांना राज्य अतिथी दर्जा देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली असून तसा आदेश काढण्यात आला आहे. त्या अन्वये, राज्यशिष्टाचारानुसार मोरारी बापू यांना त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन, वर्धा मार्गे यवतमाळ प्रवास आणि यवतमाळ येथील वास्तव्य तसेच यवतमाळ ते वर्धा मार्गे नागपूर या परतीच्या प्रवासात सरकारच्या वतीने योग्य तो सन्मान दिला जाईल. यात पोलिसांकडून मानवंदना, पायलट व एस्कॉर्ट सुविधा आणि रामकथास्थळी बंदोबस्त आदींचा समावेश आहे. 

आपली विनंती मान्य करून राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य अतिथी दर्जा दिल्याबद्दल डॉ. विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य सरकारचे आभार मानले आहेत. भारतीय संस्कृतीमधील अध्यात्म तसेच प्रेम, सत्य व करूणा आदी तत्त्वांचा जगभर प्रसार करणारे प्रमुख कथाकार असा अठ्ठ्याहत्तर वर्षीय राष्ट्रसंत मोरारी बापू यांचा लौकिक असून त्यांच्या रसाळ रामकथेचे आयोजन बऱ्याच काळानंतर विदर्भात होत आहे. दर्डा परिवारातर्फे या रामकथेचे आयोजन यवतमाळमध्ये दारव्हा मार्गावरील चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात ६ ते १४ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले. धार्मिक व उत्साही वातावरणात शनिवारी सायंकाळी चार वाजता या रामकथेला प्रारंभ होत आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र