शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Rashmi Thackeray: आता रश्मी ठाकरेंनी कंबर कसली! पक्षातील पडझड रोखण्यासाठी मैदानात; कुठे अन् कधी होणार सभा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 11:36 IST

Rashmi Thackeray: ठाकरे गट अस्तित्त्वाची लढाई लढत असून, ठाकरे कुटुंबातील जवळपास प्रत्येक सदस्य आता राजकीय मैदानात उतरताना दिसत आहे.

Rashmi Thackeray: शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पक्ष वाचवण्यासाठी तहानभूक विसरून राज्यभर दौरे करत आहेत. यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत भरच पडली. यातच शिंदे गटाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पक्षातील पडझड रोखण्यासाठी आणि पक्षबांधणीसाठी आता आदित्य आणि उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून रश्मी ठाकरे मैदानात  उतरणार आहेत.

सध्या अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या शिवसेनेसाठी आता ठाकरे कुटुंबातील जवळपास प्रत्येक सदस्य राजकीय मैदानात उतरताना दिसत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे गेल्या काही दिवसांमध्ये सतत राज्यभरातील शिवसैनिकांशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधत आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे शिवसैनिकांनाचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. 

नाशिकमध्ये रश्मी ठाकरे मेळावे घेणार

 शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर ठाकरेंना सोडून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. नाशिकमध्ये महिलांची मोठी फळी ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्याने मोठा धक्का ठाकरे गटाला बसला होता. थेट संजय राऊत यांनाच एकप्रकारे धक्का मानला जात आहे. हीच महिला आघाडी पुन्हा बळकट करण्यासाठी आणि विस्कटलेल्या संघटनात्मक बांधणीसाठी रश्मी ठाकरे मैदानात उतरणार आहेत. नाशिकमध्ये महिला मेळाव्यातून रश्मी ठाकरे करणार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. नाशिकमध्ये रश्मी ठाकरे स्वतः मेळावे घेणार आहे. पक्षातील पडझड रोखण्यासाठी रश्मी ठाकरे मैदान गाजवणार आहे. त्यामुळे रश्मी ठाकरे यांच्या मेळाव्याची जोरदार तयारी केली आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रश्मी ठाकरे या नाशिक शहरात महिला मेळावा घेणार आहे. तत्पूर्वी, रश्मी ठाकरे यांनी मुंबईतील महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. वरळी तसेच शिवडीमधील कार्यक्रमांना रश्मी ठाकरे हजर होत्या. रश्मी ठाकरे या अनेक राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र त्यांनी कधीच राजकीय विषयांवर टिप्पणी केली नाही. रश्मी ठाकरेंचा हा पहिला राजकीय दौरा असणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची डागडुजी व पदाधिकार्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी रश्मी ठाकरे नाशिकचा दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे