शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

रश्मी शुक्ला बनल्या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक; ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 06:37 IST

४ ऑक्टाेबर २०२३ राेजी ‘लाेकमत’ने रश्मी शुक्ला यांचे नाव महासंचालकपदासाठी आघाडीवर असल्याचे वृत्त दिले हाेते. 

मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेतील पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. शुक्ला यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला पोलिस महासंचालक मिळाल्या आहेत. महासंचालकपदासाठी रश्मी शुक्ला यांचे नाव आघाडीवर असल्याचे वृत्त सर्वांत आधी ‘लोकमत’ने दिले होते.  

रजनीश सेठ ३१ डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर चार दिवसांनी सरकारने रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.  राज्यात सर्वांत वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याने त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.

कार्यालयीन कामाप्रति समर्पण कार्यालयीन कामाप्रति समर्पण हा रश्मी शुक्ला यांचा विशेष गुण मानला जातो. तसेच कोणतेही काम पेंडिंग न ठेवणाऱ्या अधिकारी असा त्यांचा लौकिक आहे. पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक या खालच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कल्याणाकडे नेहमीच विशेष लक्ष देणाऱ्या अधिकारी म्हणूनही त्यांची पोलिस दलात ओळख आहे. त्या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. 

४ ऑक्टाेबर २०२३ राेजी ‘लाेकमत’ने रश्मी शुक्ला यांचे नाव महासंचालकपदासाठी आघाडीवर असल्याचे वृत्त दिले हाेते. 

अशी आहे कारकीर्द - रश्मी शुक्ला या हैदराबादच्या नॅशनल पोलिस अकादमीतून उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र पोलिस सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी विशेष काम केले. त्यासाठी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांत महिलांसाठी समुपदेशन केंद्र सुरू केले. - नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयक म्हणून काम केले होते. - २०१६ ते २०१८ या कालावधीत त्यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली. - रश्मी शुक्ला यांना २००४ साली पोलिस महासंचालक पदक, २००५ मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक आणि २०१३ मध्ये पोलिस मेडल मिळाले आहे. - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१८ मध्ये त्यांची राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती. - पुढे फेब्रुवारी २०२१ मध्ये त्या केंद्रीय राखीव पोलिस दलात अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या.  

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाPoliceपोलिसGovernmentसरकार