शहरं
Join us  
Trending Stories
1
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
2
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
3
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
4
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
5
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
6
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
7
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
9
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
10
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
11
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
12
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
13
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
14
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
15
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
16
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
17
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
18
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
19
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
20
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल

रेरा: ९ हजारांहून अधिक प्रकल्पांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 5:11 AM

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात, महारेरा अंतर्गत जुन्या प्रकल्पांची नोंदणी करण्याची मुदत सोमवारी मध्यरात्री संपुष्टात आली

मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात, महारेरा अंतर्गत जुन्या प्रकल्पांची नोंदणी करण्याची मुदत सोमवारी मध्यरात्री संपुष्टात आली, तरी सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत प्रकल्प नोंदणीचा आकडा ९ हजार प्रकल्पांवर गेला होता. एकूण प्रकल्पांत एकट्या कोकण विभाग म्हणजेच, मुंबई महानगर प्रदेशातील प्रकल्पांची संख्या साडेचार हजारांहून अधिक होती.महारेराअंतर्गत नोंदणी केलेल्या प्रकल्पांतील घरे खरेदी-विक्री करताना, ग्राहक आणि विकासकांना अडचण येणार नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. याउलट नोंदणी न केलेल्या जुन्या प्रकल्पांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. याशिवाय जुन्या प्रकल्पांतील घरांची खरेदी-विक्रीही विकासकांना करता येणार नाही. दरम्यान, मुदत उलटल्यानंतर जुन्या प्रकल्पांची नोंदणी करणाºया विकासकांना प्रकल्पाच्या किमतीच्या १० टक्क्यांपर्यंत दंड वसूल करण्याचे अधिकार प्राधिकरणाला आहेत. दंड आकारल्यानंतर अपीलीय अधिकाºयाकडे तक्रार करण्याचे अधिकार विकासकांना आहेत. मात्र, दंडात्मक कारवाई झाल्यानंतरही नोंदणी केली नाही, तर पुन्हा १० टक्क्यांपर्यंत दंड आणि ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूदही या कायद्यात आहे.सोमवारी रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ९ हजार प्रकल्पांची नोंदणी झाली होती. त्यातील ४ हजार ६००हून अधिक प्रकल्प कोकण विभागातील होते. कोकण विभागातील मुंबई उपनगरातील १ हजार ६००, शहरातील ४००, पालघरमधील ५००, रायगडमधील ७५०, रत्नागिरीमधील १५० ठाण्यामधील १ हजार १०० आणि सिंधुदुर्गमधील ६५हून अधिक प्रकल्पांची नोंदणी प्राधिकरणाकडे झाली आहे. याशिवाय राज्यातील अमरावती विभागातून ५०, औरंगाबाद विभागातून १८०, नागपूर विभागातून २२५, नाशिक विभागातून ३४०, पुण्यातून २ हजार ७०० प्रकल्पांहून अधिक प्रकल्पांची नोंदणी महारेराकडे झाली आहे.