बलात्कारी फरार
By Admin | Updated: June 27, 2016 02:43 IST2016-06-27T02:43:58+5:302016-06-27T02:43:58+5:30
सहा वर्षे उपभोग घेऊन लग्नास नकार देणाऱ्या पालघरच्या सुरेश वामन देवरे या तरुणाविरोधात ठाण्यातील तरुणींनी केळवे पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला

बलात्कारी फरार
पालघर : लग्नाचे आमिष दाखवून ७ लाख ५५ हजाराची रक्कम हडप करणाऱ्या व सतत सहा वर्षे उपभोग घेऊन लग्नास नकार देणाऱ्या पालघरच्या सुरेश वामन देवरे या तरुणाविरोधात ठाण्यातील तरुणींनी केळवे पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तो फरार झाला आहे. पालघरच्या एम ई सी बी कॉलनी येथे राहणाऱ्या देवरे या तीस वर्षीय तरुणाची माहीम येथे राहणाऱ्या मित्राने वागळे इस्टेट ठाणे येथील तरुणीशी ओळख करून दिली. तिचे रूपांतर प्रेमात झाले. सहा वर्षात त्यांचे शारीरिक संबंध झाले. लग्नाचे आमिष दाखवून सुरेश याने रोखीने, बँकेतून, सुमारे ७ लाख ५५ हजार रुपये घेतल्याची तक्रार या तरुणीनी केळवे पोलीस स्थानकात केली आहे.